मुंबई : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे.

सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संपूर्ण राज्यात सोमवारी पावसाचा जोर अधिक होता. अनेक भागात संपूर्ण दिवसभर पाऊस कोसळला. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम होता. यामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे झाली आहे .तेथे सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत २६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत झालेली पावसाची नोंद (जिल्हानिहाय)

रत्नागिरी

दापोली – २३० मिमी

मंडणगड – १६८ मिमी

चिपळूण – १५० मिमी

संगमेश्वर – १३४ मिमी

लांजा – २१४.५ मिमी

खेड – १५५ मिमी

गुहागर – १२२ मिमी

सिंधुदुर्ग

वैभववाडी – २३० मिमी

दोडामार्ग – ६० मिमी

मालवण – ५८ मिमी

कुडाळ – ९८ मिमी

कणकवली – १२० मिमी

मुळदे – १०३.४ मिमी

रामेश्वर – ११६.२ मिमी

सावंतवाडी – ९३ मिमी

देवगड – १३१ मिमी

कोल्हापूर

राधानगरी – २२१ मिमी

गगनबावडा – २६१ मिमी

कागल – ६६ मिमी

शाहूवाडी – १६१ मिमी

पन्हाळा – ४७ मिमी

चंदगड – ४६ मिमी

आजरा – ३५ मिमी

गडहिंग्लज – ५७ मिमी

हातकणंगले – ५८ मिमी

शिरोळ – १३ मिमी

सांगली

वाळवा- १६ मिमी

तासगाव – १४ मिमी

शिराळा – ५३ मिमी

आटपाडी – १९ मिमी

कडेगाव – २० मिमी

कवठे महाकाळ- ६ मिमी

पलूस – ७ मिमी

कसबेडिगरज- २३.८ मिमी

मिरज – २६ मिमी

कोकरुड – ५६ मिमी

संख- १८ मिमी

पुणे

लवाळे – ४६.५ मिमी

पाषाण – ४३ मिमी

चिंचवड – ३९.५ मिमी

शिवाजीनगर – ३५.२ मिमी

तळेगाव – ३४ मिमी

हडपसर – २०.५ मिमी

मगरपट्टा – २०.५ मिमी

हवेली – १६.५ मिमी

गिरीवन – १०.५

निमगिरी – ९ मिमी

डुडुळगाव – ८.५ मिमी

राजगुरुनगर – ६.५ मिमी

बारामती – ६.२ मिमी

दौंड – ५.५ मिमी

ढमढेरे – ४ मिमी

दापोडी – ४ मिमी

माळिन – ३ मिमी

घाट परिसरातील २४ तासांत झालेला पाऊस

ताम्हिणी – ३२० मिमी

नवजा- ३०८ मिमी

दाजीपूर – ३०३ मिमी

डोंगरवाडी – २७१ मिमी

भिरा- २६१ मिमी

गगनबावडा – २६० मिमी

माथेरान – २५५ मिमी

गजापूर – २३९ मिमी

सावर्डे – २३३ मिमी

वरंडोली – २२६ मिमी

दवडी – २२५ मिमी

आंबोली – २२२ मिमी

पोफळी- २१५ मामी

शिरगाव – २१० मिमी

भालवडी – २०६ मिमी

मांडुकली – २०४ मिमी

कोयनानगर – २०७ मिमी

आंबवणे – १९६ मिमी

दूधगंगा – १९३ मिमी

घिसर – १९२ मिमी

लोणावळा- १८९ मिमी

कुंभेरी – १८० मिमी

महाबळेश्वर – १७३ मिमी

खंडाळा – १६७ मिमी

अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह ठाणे, पालघर भागात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. याचबरोबर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.