मुंबई : महारेराकडे जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेल्या २१२ प्रकल्पांबाबत महारेराच साशंक आहे. हे प्रकल्प सुरु झाले आहेत का? या प्रकल्पांची सद्यस्थिती काय याबाबतची कोणतीही माहिती या प्रकल्पांतील विकासकांनी महारेराकडे सादर केलेली नाही. प्रकल्प महारेराकडे नोंदविल्यानंतर दर तीन महिन्याला महारेराकडे त्रैमासिक प्रगती अहवाल विहित प्रपत्रात सादर करून तो संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. असे असताना विकासकांनी माहितीच दिली नसल्याचे उघड झाले आहे.

जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान महारेराकडे नोंदविलेल्या २३६९ प्रकल्पांपैकी ८८६ प्रकल्पांनी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर केले नव्हते. त्यामुळे हे प्रकल्प स्थगित करून त्याचे बँक खाते गोठवणारी, प्रकल्पाच्या सर्व व्यवहारांवर बंदी आणण्यासाठीची कलम ७ अंतर्गत ३० दिवसांची नोटीस दिली होती. शिवाय वेळोवेळी दूरध्वनीवरून आवाहनही केले होते. त्यानंतर यापैकी ६७२ प्रकल्पांनी दंडाची रक्कम भरली. त्यातील २४४ प्रकल्पांनी रक्कम भरूनही त्रैमासिक प्रगती अहवालाची पूर्तता केलेली नाही. त्यांच्याकडून हे अहवाल अद्ययावत करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी जानेवारीतील ६०, फेब्रुवारीतील ५८, मार्चमधील ४० आणि एप्रिलमधील ५६ अशा एकूण २१२ प्रकल्पांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. हे प्रकल्प सुरू झाले आहेत की नाही, त्यांची सद्यस्थिती काय याचीही माहिती नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांची यादी महारेराने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे घर खरेदी करताना ही यादी तपासावी असे आवाहन महारेराने केले आहे.

expressway projects Maharashtra marathi news
राज्यातील सहा प्रकल्पांसाठी ६७ हजार कोटींच्या निविदा, निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय
Money Mantra, transit fare,
Money Mantra: पुनर्विकासादरम्यान मिळणाऱ्या ट्रान्झिट भाड्यावर कर भरावा लागतो का?
msrdc announced land acquisition for ring road
खेड, हवेलीतील शेतकऱ्यांना लागली लॉटरी… झाले काय?
Why did the victims of Barganga project in Raigad boycott the election
१० हजार मतदारांपैकी केवळ ७ जणांचे मतदान! रायगडात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार का घातला?
Action against polluting 4 RMC projects cases filed for unauthorized construction
प्रदूषणकारी ४ आरएमसी प्रकल्पांवर कारवाई, अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
ED , investigation, Tadoba,
ईडीने सुरू केला ताडोबा प्रकल्पातील १२ कोटींच्या घोटाळ्याचा तपास
housing projects maharera marathi news
गृहप्रकल्पातील सर्व सुविधांचाही तपशील देणे विकासकांसाठी बंधनकारक, महारेराकडून आदेशाचा मसुदा प्रसिद्ध
gadchiroli microscope theft case marathi news
गडचिरोली : ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरण; नव्याने कार्यालयीन चौकशी, तपासावर प्रश्नचिन्ह

हेही वाचा – पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही

२१२ प्रकल्प असे :

मुंबई महाप्रदेशातील कोकणसह क्षेत्र

पालघर- २३, ठाणे – १९, रायगड- १७, मुंबई शहर- ७, मुंबई उपनगर- ४, रत्नागिरी – ५, सिंधुदुर्ग- १

एकूण – ७६

पुणे क्षेत्र

पुणे -४७, सांगली -६, सातारा -५, कोल्हापूर- ४, सोलापूर-२

एकूण ६४

हेही वाचा – एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक- २३, अहमदनगर- ५, जळगाव- ३

एकूण- ३१

विदर्भ

नागपूर- ८, अमरावती – ४, चंद्रपूर ,वर्धा प्रत्येकी ३ , भंडारा, बुलडाणा आणि अकोला प्रत्येकी १

एकूण-२१

मराठवाडा

संभाजीनगर-१३, बीड- ३, नांदेड- २, लातूर आणि जालना प्रत्येकी १

एकूण- २०