मुंबई : विविध यांत्रिकी कामांसाठी  रविवारी, नाताळच्या दिवशी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-विद्याविहार दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर आणि हार्बरवर वडाळा रोड-मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गावर ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल विलंबाने धावणार आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालिनी ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ‘ब्लॉक’ असेल. रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक होणार नाही. मात्र रविवार वेळापत्रक लागू असणार आहे.

 रविवारी सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ‘मेगाब्लॉक’ आहे. त्यामुळे सीएसएमटी आणि घाटकोपरदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. या दोन स्थानकांदरम्यान भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांत लोकल गाडय़ांना थांबा देण्यात आला आहे. हार्बरवर वडाळा-मानखुर्ददरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘मेगाब्लॉक’ आहे.    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गावर २४ डिसेंबरच्या रात्री १२ ते २५ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजेपर्यंत ‘मेगाब्लॉक’ आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल -माहीम स्थानकांदरम्यान आणि अंधेरी-सांताक्रूझदरम्यान लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर मात्र ‘मेगाब्लॉक’ नाही.