मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात हलक्या सरी बसरत आहेत. कोकण, तेसच विदर्भात बुधवारी काही ठिकाणी पाऊस पडला. मात्र कोकणात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. तर विदर्भात पुढील तीन ते चार दिवस गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाचे प्रमाण कमी असेल.
सध्या पावसाला अनुकूल वातावरण नसल्याने पुढचे काही दिवस राज्यात पावसाचा फारसा जोर नसेल. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागात हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही. दरम्यान, कोकणात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार नाही.
विदर्भात मात्र पुढचे दोन – तीन दिवस पाऊस पडणार आहे. या कालावधीत येथे गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ वगळता इतर सर्व भागात पावसाची उघडीप राहणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा फारसा जोर नसेल. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची उघडीप
राज्यातील इतर भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशमध्ये पावसाची पुढील काही दिवस तरी उघडीप राहील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर या भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कमाल तापमानात वाढ
राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवस सर्वत्र पाऊस पडत असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली होती. मात्र, आता तापमानात पुन्हा वाढ होईल. राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली. तेथे ३०.३ अंश सेस्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. अनेक दिवसांनी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली.