करोना रुग्णांची संख्या मुंबईत पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली असून बुधवारी ८५२ नवीन रुग्ण सापडले. मंगळवारी हीच संख्या ४७९ एवढी होती. एका दिवसांत दीडपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे.

सापडलेल्या नवीन करोना रुग्णांपैकी ८१६ रुग्णांना लक्षणे नाहीत तर ३६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी १२ रुग्णांना ऑक्सिजन खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एका ६३ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यांना दीर्घकालिन आजार होते. नव्याने सापडणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमीच राहिले आहे. बुधवारी ४३३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही ३ हजार ५४५ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर कमी होऊन ९७.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत एकही चाळ, झोपडपट्टी आणि इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही.

करोना रुग्णवाढ माहिती
३१ जुलै-३२२ रुग्ण
५ ऑगस्ट-४४६ रुग्ण

८ ऑगस्ट-४०७ रुग्ण
९ ऑगस्ट-४७९ रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० ऑगस्ट-८५२ रुग्ण