मुंबई- पालिकेच्या केईएम रुग्णालयातील एका विभाग प्रमुखांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनसुार आरोपी डॉक्टराने २०१५ ते २०२५ या काळात तक्रारदार महिलेचा तसेच त्यांच्या दोन लहान मुलींचा विनयभंग केला होता.

तक्रारदार महिला या डॉक्टर असून त्यांचे पती मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयात अतिरिक्त प्राध्यापक म्हणून काम करतात. रुग्णालयातील एका विभागाच्या प्रमुखांशी त्यांचा जुना वाद आहे. या महिला डॉक्टरने भोईवाडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार विभागप्रमुख असलेल्या डॉक्टरांनी २०१५ ते २०२५ या काळात तक्रारदारांच्या पतीला धमकी दिली. तसेच त्यांना व त्यांच्या दोन्ही लहान मुलींना अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तक्रारदार डॉक्टर महिलेचा सविस्तर जबाब नोंदविला असून आरोपी डॉक्टरविरोधात कलम विनयभंग केल्याप्रकरणी ७४, ३५२, ३५१ (२) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.