मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वे रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. करी रोड आणि चिंचपोकळी ही दोन्ही स्थानके एकसारखी दिसत असल्याने ती जुळी स्थानके म्हणून ओळखली जातात. मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक असल्याने, या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

  • कुठे : सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
  • कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
  • परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी – विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार – सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्ग

  • कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर
  • कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
  • परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल; तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
  • कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत
  • परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येईल. ब्लॉक काळात काही चर्चगेट लोकल वांद्रे / दादर स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात येतील.