मुंबई : हार्बर मार्गावरील कुर्ला – टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे १४.३० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड – मानखुर्ददरम्यानची लोकल सेवा बंद राहील.
शनिवारी रात्री ११.०५ ते रविवारी दुपारी १.३५ पर्यंत हा ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर १४.३० तासांचा हा ब्लॉक असून यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. ब्लॉक कालावधीत वडाळा रोड – मानखुर्ददरम्यान लोकल उपलब्ध होणार नाहीत.
शनिवारी रात्री १०.२० ते रविवारी दुपारी २.१९ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर, शनिवारी रात्री १०.०७ पासून रविवारी दुपारी १२.५६ पर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
- ब्लॉकपूर्वी शेवटची पनवेल – सीएसएमटी लोकल रात्री ९ .५२ वाजता सुटेल.
- डाऊन हार्बर मार्गावरील वाशी/बेलापूर/पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.१४ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतरची पहिली लोकल रविवारी दुपारी १.०९ वाजता पनवेलहून सीएसएमटी दिशेने जाईल.
- डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीहून रविवारी दुपारी १.३० वाजता सुटेल.
- ब्लॉकदरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.