Pune Breaking News Live Updates, 01 August 2025 : मालेगाव बॉम्बस्फोटानंतरच ‘भगवा दहशतवाद’चा उल्लेख, स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यावर भगव्या दहशतवादावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडीतील लघुउद्योजकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर आता या ठिकाणी औद्योगिक झोन विकसित करुन उद्योजकांचे पुनवर्सन करण्याची उद्योजकांची मागणी आहे. दरम्यान, आता ऑगस्ट महिन्यात आणि मुख्यत्वेकरून पहिल्या दोन आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस सरासरी पेक्षा कमी राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News Live Updates in Marathi : मुंबई, पुणे, मुंबई-महानगर, नागपूरच्या महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

21:32 (IST) 1 Aug 2025

पिंपरीत सोनसाखळी चोराकडून तरुणावर गोळीबार

ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी कॅम्पातील साई चौकाजवळ घडली. ...वाचा सविस्तर
21:24 (IST) 1 Aug 2025

पुण्याचे ‘दादा’ आणि राजकीय टोलेबाजी!

‘तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही,’ अशी टिप्पणी फडणवीस यांनी लगावताच, ‘तुमच्याबरोबर यायचे ठरले तेव्हा पुण्याचा पालकमंत्री करतो, हे कबूल केल्याने तुमच्याबरोबर आलो,’ असे अजित पवार म्हणाले आणि व्यासपीठावर हस्याचे फवारे उडाले. ...वाचा सविस्तर
21:23 (IST) 1 Aug 2025

धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

धारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (३७) याला अटक केली. ...सविस्तर बातमी
21:14 (IST) 1 Aug 2025

सद्विचारी लोकांच्या एकत्र येण्यातून परिवर्तन; पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांचे मत

राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र यांच्या वतीने एका अनौपचारिक कार्यक्रमात दिलीप माजगावकर यांच्या हस्ते दिलीप कुलकर्णी यांना ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...सविस्तर वाचा
21:02 (IST) 1 Aug 2025

स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत मोठी बातमी… मुख्यमंत्र्यांच्या गृह शहरात मीटरविरोधकांनी पेटवल्या मशाली..

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलक मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एकत्र आले. ...अधिक वाचा
20:46 (IST) 1 Aug 2025

पुण्यात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे आंदोलन

नागपूर येथील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र शिक्षण राजपत्रित अधिकारी संघाने सामूहिक रजा आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार, पुण्यासह राज्यभरात आंदोलन करण्यात आले. ...सविस्तर वाचा
20:41 (IST) 1 Aug 2025

'या' दिवशी हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द; मध्य, पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार, प्रवाशांना पर्यायी मार्गाने करावा लागणार प्रवास

येत्या रविवारी मेगाब्लाॅक घेऊन मुख्य आणि हार्बर मार्गावर देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ...सविस्तर बातमी
20:20 (IST) 1 Aug 2025

नेत्यांनी सत्य बोललेच पाहिजे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अपेक्षा; लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार’ नितीन गडकरी यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. ...सविस्तर बातमी
19:45 (IST) 1 Aug 2025

गमावलेले भाग वनस्पतींकडून पूर्ववत; पेशींकडून स्वत:च्या आकारात कसे बदल केले जातात, यावर आयसर-पुणेचे संशोधन

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर, पुणे) डॉ. कालिका प्रसाद यांच्या संशोधन गटाने नेदरलँड्स, यूके आणि आयसर-तिरुवनंतपुरम येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने याबाबत संशोधन केले. ...अधिक वाचा
19:06 (IST) 1 Aug 2025

पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावात तणाव; जमावाला रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

दौंड तालुक्यातील यवत गाव परिसरात समाजमाध्यमातील आक्षेपार्ह मजकुरामुळे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास तणाव निर्माण झाला. दोन गट समोरासमोर आले. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. ...अधिक वाचा
18:52 (IST) 1 Aug 2025

बालहक्क आयोगातील पदे अद्यापही रिक्तच, आयोगाकडे १४३१ प्रकरणे प्रलंबित

गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र बालहक्क आयोगातील नियुक्त अध्यक्ष आणि सदस्यांच्या कार्यकाळ संपुष्टात आला असून या पदांवर अद्यापही नियुक्ती करण्यात आलेली नाही. तब्बल १४३१ प्रकरणे प्रलंबित असून या प्रकरणांतील बालके न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ...सविस्तर वाचा
18:23 (IST) 1 Aug 2025

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पंदन’; काय आहे उपक्रम?

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेसारख्या मूलभूत जीवन कौशल्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’द्वारे मूल्यमापन करण्यात आले. ...सविस्तर वाचा
18:14 (IST) 1 Aug 2025

पिंपरी महापालिकेच्या ५७ नागरी सेवा ऑनलाइन; नागरिकांना घरबसल्या लाभ घेणे शक्य

राज्य शासनाच्या १५० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
17:26 (IST) 1 Aug 2025

काँग्रेसमध्ये बदलांचा धडाका… राज्य युवक काँग्रेसमध्येही नवे नेतृत्त्व

शिवराज मोरे हे विद्यार्थी आणि युवक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता आहेत. २०१०मध्ये त्यांनी एनएसयूआय महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ...सविस्तर बातमी
16:46 (IST) 1 Aug 2025

बांबूच्या राख्या आदिवासी कुटुंबांना आधार

गेल्या काही वर्षात बाजारात पर्यावरणपूरक राख्यांसाठी मागणी वाढली असून गेली काही वर्षे वसई तालुक्यातील भालिवली गावातील आदिवासी महिला बांबूपासून राख्या तयार करत आहेत. ...अधिक वाचा
16:45 (IST) 1 Aug 2025

सेवा सहकारी सोसायटींवर आयकराचा बोजा?; खासदारांनी अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी...

परिणामी, अशा निर्णयामुळे सेवा सहकारी पतसंस्था व ग्रामीण अर्थकारण संकटात येईल, अशी भीती काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केली आहे. बळवंत वानखडे यांनी यासंदर्भात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. ...वाचा सविस्तर
16:20 (IST) 1 Aug 2025

भाजप हा ‘हिंदुत्ववादी’ पक्ष नाही; कोणी केली ही खरमरीत टीका ?

हिंदू महासभेच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त टिळक भक्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात महासभेच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 1 Aug 2025

मंत्र्यांची बेशिस्त खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेशिस्त वर्तणूक करेल तर खपवून घेणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असे सगळ्यांना आम्ही तिघांनी (फडणवीस, शिंदे, पवार) सांगितले आहे. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 1 Aug 2025

महिला मजुरांना घेऊन जाणारे वाहन झाडावर आदळले ; १ ठार २१ जखमी

जखमी झालेल्या महिला मजुरांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथून गंभीर जखमीना भंडारा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. ...सविस्तर बातमी
15:46 (IST) 1 Aug 2025

गाळात चाललेल्या शेतकरी कामगार पक्षाला राज ठाकरे देणार पक्ष वाढीचे धडे…. 

ठाकरे यांच्या प्रबोधनातून यापुढे शेकापची मोट बांधण्याचा प्रयत्न शेकापचे माजी आ. जयंत पाटील यांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
15:42 (IST) 1 Aug 2025

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ठाकरे गटाचे ‘बाप तो बाप रहेगा’ आशयाचे बॅनर

राजन विचारे यांचा आज, शुक्रवारी वाढदिवस आहे. याच दरम्यान आता, ठाकरे गटाच्या घोडबंदर भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजन विचारे यांचे फलक झळकविले आहेत. ...अधिक वाचा
15:21 (IST) 1 Aug 2025

जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार; नगर रस्त्यावरील घटना

जमिनीच्या वादातून एकाने चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात गुरुवारी रात्री घडली. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...सविस्तर वाचा
15:13 (IST) 1 Aug 2025

ठाणे ते पुणे प्रवास महागडा; साधारण बसगाडीच्या तुलनेत दुप्पट दर

ठाणे एसटी विभागात आठ मुख्य आगार असुन येथून दररोज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या गाड्या जातात. ठाण्यातील वंदना तसेच खोपट आगारातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. ...सविस्तर बातमी
15:13 (IST) 1 Aug 2025

पत्नीपीडित असाल तर '' या ठिकाणी '' मिळणार न्याय

पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक छळाच्या विरोधात आतापर्यंत महिलांसाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे, महिला आयोगाकडून कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत यांसारख्या गोष्टींचे आयोजन होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. ...अधिक वाचा
15:13 (IST) 1 Aug 2025

पत्नीपीडित असाल तर '' या ठिकाणी '' मिळणार न्याय

पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक छळाच्या विरोधात आतापर्यंत महिलांसाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे, महिला आयोगाकडून कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत यांसारख्या गोष्टींचे आयोजन होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. ...अधिक वाचा
15:08 (IST) 1 Aug 2025

अखेर शिक्षकांचे वेतन मार्गी; प्रभारी शिक्षण अधिकाऱ्याच्या नियुक्तीने शिक्षकांना दिलासा

उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी तातडीने लेखा विभागातील दीपक धनगर यांची प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर शिक्षक, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतनाचे धनादेश बँकेत जमा करण्यात आले. ...सविस्तर बातमी
15:02 (IST) 1 Aug 2025

माजी मंत्री राऊत पुत्रास धक्का; युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मोरें कडे

राऊत यांनी युवक काँग्रेस कार्यकारिणीतील तब्बल ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले होते. त्याविरोधात पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ दाद मागितली होती. त्यानंतर तो आदेश मागे घेण्यात आला होता. ...अधिक वाचा
14:50 (IST) 1 Aug 2025

‘कुर्ला मदर डेअरी वाचवा…’ , रहिवासी ७ ऑगस्टला ‘वर्षा’वर धडकणार; निवेदन पदयात्रेच्या माध्यमातून धारावीसाठी जागा न देण्याची करणार मागणी

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यात आली आहे. कुर्लावासियाचा ही जागा धारावीसाठी देण्यास तीव्र विरोध असून यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले आहे ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 1 Aug 2025

नवी मुंबई : ११ लाख रुपयांच्या पॅडेनियम धातूची चोरी; संशयित अटक

अनिल भालेराव नावाची व्यक्ती ३७ मार्च पासून पर्यवेक्षक पदावर काम करीत होती. मात्र हे काम करत असताना त्याने ११ लाख रुपयांचा  पॅडेनियम धातू चोरी केला. ...सविस्तर वाचा
14:41 (IST) 1 Aug 2025

२००८ सालचा बॉम्बस्फोट खटला; एटीएसच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश

एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या दोन्हींना आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचा निर्वाळा दिल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले. ...वाचा सविस्तर

Today’s Nagpur Mumbai Pune News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह १ ऑगस्ट २०२५