Pune Latest News Today 15 July 2025 : मुंबईत मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली. तर पुण्यातील तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.

तेव्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर तसंच मुंबई महानगरातील, पुणे नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Mumbai Nagpur   News Updates in Marathi

00:15 (IST) 16 Jul 2025

वाहनांवरील कर्जाचा बोजा उतरविण्यासाठी ‘ऑनलाइन’ प्रक्रिया; ‘आरटीओ’त जाण्याची आवश्यकता नाही

कर्ज काढून वाहन खरेदी केलेल्यांना वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ उतरविताना स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. ...अधिक वाचा
23:50 (IST) 15 Jul 2025

पावसाळी हवेमुळे महिला आजारी! ओलसर कपड्यांमुळे मूत्रमार्गासह योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका

पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे महिलांमध्ये आरोग्य समस्या वाढू लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
23:39 (IST) 15 Jul 2025

निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात दरोडा; ८३ तोळे सोन्याचे दागिने, रोकड लुटून चोरटे पसार

निवृत्त अधिकारी, तसेच त्यांच्या पत्नीला धमकावून चोरट्यांनी सोन्याचे हिरेजडीत ८३ तोळे दागिने, साडेसात लाख रुपये असा ५९ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. ...वाचा सविस्तर
23:05 (IST) 15 Jul 2025

उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी चार सामंजस्य करार

या सामंजस्य कराराअंतर्गत सुमारे ३१ हजार ९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून ६४५० मेगावॉट वीजनिर्मिती होईल आणि १५ हजार रोजगार निर्मिती होईल. ...अधिक वाचा
20:54 (IST) 15 Jul 2025

दोन्ही शिवसेनेच्या वादात मंत्र्यांचाच सभागृहात गोंधळ

यावेळी झालेल्या गोंधळात चक्क मंत्र्यांनीच अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत गोंधळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...अधिक वाचा
19:39 (IST) 15 Jul 2025

Video : मुंबई - गोवा महामार्गावर पाणीच पाणी...

या महामार्गाचे काम करतांना पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था का केली गेले नाही असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांकडून उपस्थित केले जात होते. ...वाचा सविस्तर
19:24 (IST) 15 Jul 2025

"पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे", पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा यांची मागणी

नदी पात्रात समाधी असून त्याच्या आजूबाजूला म्हशीची गोठा, सांडपाणी साचते, पावसाळ्यात पाण्याने त्या परिसरात पाणीच पाणी होऊन जाते. ...वाचा सविस्तर
19:01 (IST) 15 Jul 2025

“खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभाग दोषी,’’ सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांच्या इशारा…

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी झाली. ...सविस्तर वाचा
18:30 (IST) 15 Jul 2025

...आणि १९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी

जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा 'आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...सविस्तर वाचा
18:25 (IST) 15 Jul 2025

नालासोपाऱ्यात प्रवाशांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण; घटनेची चित्रफीत प्रसारित

मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित होत आहे. ...वाचा सविस्तर
18:22 (IST) 15 Jul 2025

कापूस उत्पादनात अकोल्याची राष्ट्रीय पातळीवर छाप! ‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ मध्ये महाराष्ट्र चमकला; ‘या’ जिल्ह्यांना...

‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले. ...अधिक वाचा
17:27 (IST) 15 Jul 2025

ऑनलाईन नवरा नको गं बाई…वाशीत विवाहसंस्थेतील गुन्हेगारिसंबंधी माहिती देणारे संमेलन

ऑनलाईन माध्यमांवर आपली संपुर्ण माहिती देऊन अनुरूप स्थळाची निवड करण्यास सुरूवात झाली. मात्र, या ऑनलाईन विवाहसंस्थेमुळे गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. ...अधिक वाचा
17:12 (IST) 15 Jul 2025

पत्राचाळीतील रहिवाशी धडकले म्हाडावर…६७२ सदनिकांचा ताबा देण्यासह अनेक मागण्या मान्य…

वैयक्तिक करार आणि पुनर्वसित इमारतीतील सर्वच्या सर्व ६७२ घरांचा ताबा सोसायटीला देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी पत्राचाळीतील रहिवाशांनी म्हाडावर आक्रोश मोर्चा काढला होता. ...अधिक वाचा
17:01 (IST) 15 Jul 2025

ठाण्यात तीन शाळकरी मुलींचा विनयभंग

ठाण्यातील वर्तकनगर भागात तीन शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...अधिक वाचा
16:36 (IST) 15 Jul 2025

सत्ताधारी आमदाराच्या नेतृत्वात आंदोलन; मात्र कायदेशीर नोटीस फक्त शेतकऱ्यांनाच, दंडाची रक्कम भरणार कोण?

मागील ११ वर्षांपासून रखडलेल्या (भेल) प्रकल्पाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा शेती सुरू केली. विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी शेतकऱ्यांसोबत प्रकल्पाच्या जमिनीवर उभे राहत आंदोलनाचे नेतृत्व केले. ...वाचा सविस्तर
16:32 (IST) 15 Jul 2025

लोकलची ५० मिनिटे विलंबयात्रा…पाऊसधारांनी रेल्वे कोलमडली

पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने लोकल सेवा संथगतीने मार्गस्थ होत होत्या. त्यामुळे सकाळी उपनगरांतून निघालेल्या प्रवाशांना मुंबईत पोहोचण्यासाठी प्रचंड उशीर झाला. ...अधिक वाचा
16:26 (IST) 15 Jul 2025

बच्चू कडूंसह १२ आंदोलकांवर गुन्हा, काय आहे कारण जाणून घ्या…

महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. या प्रकारामुळे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 15 Jul 2025

बुलढाणा: गुटखा तस्करीचे 'एमपी कनेक्शन' उघड

मध्य प्रदेश मधून प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. ...सविस्तर वाचा
15:54 (IST) 15 Jul 2025

सिंचनाच्या स्वयंपूर्णतेने शेतकऱ्यांची किमया; गोंदियात धान लागवडीत लक्षणीय वाढ

गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. ...अधिक वाचा
15:47 (IST) 15 Jul 2025

मताधिक्य घटल्याने लातूरमध्ये अमित देशमुख ‘जमिनीवर ’

विलासराव देशमुख या लोकाभिमुख नेत्याचे राजकीय वारसदार असलेल्या अमित देशमुखांची ओळख ‘लोकांपासून अंतर राखून असणारा नेता’ अशी आहे. ...सविस्तर बातमी
15:45 (IST) 15 Jul 2025

महावितरणच्या कामाला गती; वसई पूर्वेतील वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न

नालासोपारा ते कामण अशी विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नवीन ११० मोनोपोल उभारणी व २२ किलोमीटर विद्युत वाहिनी अंथरणे अशा कामाला महावितरणने गती दिली आहे. ...वाचा सविस्तर
15:44 (IST) 15 Jul 2025

मध्य नागपुरात राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसमध्ये शक्तिवृद्धी

मध्य नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार)चे अध्यक्ष रवी पराते यांच्यासह सुमारे १०० पदाधिकारी, कार्यकर्ते माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात आले आहेत. ...सविस्तर बातमी
15:41 (IST) 15 Jul 2025

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट खिडक्या बंद, एटीव्हीएम सयंत्र कोठडीत

मागील काही महिन्यांपासून हा रेल्वे तिकीट खिडकी बंद राहत असल्याचा प्रकार ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडत आहे. रेल्वे अधिकारी यासाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत आहे, असे प्रवाशांनी सांगितले. ...सविस्तर वाचा
15:30 (IST) 15 Jul 2025

नागपुरात स्पा आडून देहव्यवसायाचा पर्दाफाश: महिलाच बनल्या सौदागर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपुरात कायदा व सुव्यवस्थेला नख लागू नये, अशी सामान्यांची धारणा असते. मात्र हेच शहर आता बेकायदेशीर कृत्यांचा अड्डा बनत चालले आहे. ...वाचा सविस्तर
15:18 (IST) 15 Jul 2025

उच्च न्यायालय थेट म्हणाले, ‘संबंध सुधारण्यासाठी वैवाहिक कायदे, मात्र गैरवापरच अधिक...’

‘कलम २१’ ने पती-पत्नी या दोघांनाही आनंदाने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे, असेही न्यायालयाने निर्णयात सांगितले. ...सविस्तर बातमी
15:05 (IST) 15 Jul 2025

बोगस बियाणे! दोषी अधिकाऱ्यांवर होणार हत्या सदृश्य गुन्हे दाखल ? कृषी खात्यात खळबळ….

खरीप हंगाम जोरात असतांनाच शेतकऱ्यांनी लावलेले बियाणे बोगस निघाले तर हाहाकार उडणारच. तशा लेखी तक्रारी झाल्या. ...सविस्तर वाचा
15:04 (IST) 15 Jul 2025

जुलैत जलस्त्रोतांमध्ये विक्रमी पाणीसाठा, बारवी धरण ७५ टक्क्यांवर, भातसा, आंध्रातही समाधानकारक पाणीसाठा

ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणात तब्बल ७५ टक्के इतका विक्रमी पाणीसाठा झाला आहे. तर भातसा धरणातही ७७ आणि आंध्रा धरणात ७२ टक्के पाणीसाठा आहे ...अधिक वाचा
14:53 (IST) 15 Jul 2025

ठाणे महापालिककेत अभियंत्यांची पदे रिक्त… रिक्त पदांचा ताण दुसऱ्या अभियंत्यांच्या खांद्यावर

शहरातील विकास कामांत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील मंजूर ३०० पैकी १६६ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 15 Jul 2025

धुळ्यात युवकाची हत्या करणाऱ्या तीन भावांना आजन्म कारावास

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी मयूर, मनोज आणि मुकेश या शार्दूल भावांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली. ...वाचा सविस्तर
14:29 (IST) 15 Jul 2025

नवी मुंबई: धुवाधार पाऊस त्यात खड्ड्यांचे विघ्न, नागरिकांची तारांबळ

शहरातून शीव पनवेल, पाम बीच, ठाणे बेलापूर महामार्ग असून अशा सर्व ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने वाहनांच्या वेगांना ब्रेक लागत होता. ...अधिक वाचा

Nagpur Pune Mumbai Breaking News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज   १५ जुलै २०२५