Mumbai Live News Updates, 29 July 2025 : सक्तवसुली संचलालयाने (ईडी) वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी तेथील महापालिकेतील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांच्या निवास्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. बहुसंख्य छापे या अधिकाऱ्याच्या संबंधित ठिकाणांवर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान , राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात स्थापन विशेष तपास पथक पाळेमुळे खणत आहे. पथकाने आतापर्यंत घोटाळ्यात सहभागी २४ अधिकारी, मुख्याध्यापकांना अटक करीत प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. तर, विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर महाविद्यालये, विद्यापीठांनी त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. राज्य शासन, विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काप्रमाणे महाविद्यालयांनी अभ्यासक्रम शुल्काबाबत माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच, शुल्क निश्चितीबाबतची कागदपत्रे महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच राज्यात गेल्या आठवड्यात सक्रीय झालेल्या पावसाने रविवारपर्यंत जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi : मुंबई-महानगर, पुणे- नागपूरच्या ताज्या घडामोडी...

10:19 (IST) 30 Jul 2025

कांदा दरात २५० रुपयांनी घसरण… शेतकरी देवेंद्र फडणवीस यांना लासलगावला का बोलावताय ?

जुलैच्या मध्यावर कांद्याला दीड हजार रुपये दर होता. उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरु झाल्यापासून सरासरी दर एक ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. ...सविस्तर बातमी
22:08 (IST) 29 Jul 2025

व्हीपीपीएलकडून स्थानिक समुदायासाठी सेवा रस्त्याची घोषणा; आर्थिक विकासाला मिळणार चालना

या सेवा रस्त्याच्या स्थानिकांसाठी खुला ठेवण्यात येणार असून यामुळे वाहतूक सुलभ होऊन स्थानिक व्यापार आणि सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी एक प्रेरक घटक ठरण्याची अपेक्षा आहे. ...वाचा सविस्तर
21:15 (IST) 29 Jul 2025

राज्यात पावसाची दडी... पुढील काही दिवस ऊन - पावसाचा खेळ

मुंबईसह राज्यातील बहुतांशी भागात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात ऊन- पावसाचा लंपडाव चालणार आहे. ...अधिक वाचा
21:07 (IST) 29 Jul 2025

'बिल गेट्स'ला चहा पाजणाऱ्या 'डॉली चायवाला'चे इन्स्टाग्राम अकाउंटच बंद, लाखो फॉलोवर्स…

‘डॉली की टपरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या चहाच्या गाड्यावर रोज शेकडो ग्राहक येतात. युट्युबवर त्यांचा चॅनेल असून त्याला १३ लाखांहून अधिक सदस्य आहेत. ...वाचा सविस्तर
20:55 (IST) 29 Jul 2025

विश्वविजयानंतर दिव्या देशमुखची खास पोस्ट, चषकाला चुंबन घेत म्हणाली….

'अनस्टॉपेबल' या प्रेरणादायी गाण्याच्या पार्श्वभूमीवर तिने आपला विजय साजरा करत असलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यात ती सुवर्ण मुकुटासारखा चषकालाला चुंबन देताना दिसते. ...वाचा सविस्तर
20:41 (IST) 29 Jul 2025

Video : बारमध्ये शासकीय फायलींवर सह्या करणारे अधिकारी अखेर तडकाफडकी निलंबित…

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित रस्त्यांच्या कामांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर असताना अधिकाऱ्याने बारमध्ये बसून स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकरण समोर आल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. ...सविस्तर बातमी
20:12 (IST) 29 Jul 2025

‘एमपीएससी’कडून पदभरतीची सर्वात मोठी जाहिरात; १ ऑगस्टपासून अर्ज सुरू, ९ नोव्हेंबरला परीक्षा…

या परीक्षेसाठी १ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. २१ ऑगस्टपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे. ...वाचा सविस्तर
19:40 (IST) 29 Jul 2025

सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात धुसफूस; भाजप मुख्यमंत्र्यांकडे गैरसमज पसरवित असल्याचा शिवसेनेचा आरोप

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत (मालवण-कुडाळ) आणि संजू परब (सावंतवाडी) यांच्या विरोधात थेट तक्रार केली आहे. ...सविस्तर वाचा
19:34 (IST) 29 Jul 2025

एमएमआरडीएने अखेर ५६०.२१ कोटी रुपये केले जमा; एमएमओपीएल आणि एमएमआरडीएमध्ये सुरू होता वाद

‘घाटकोपर - अंधेरी - घाटकोपर मेट्रो १’ मार्गिका प्रकल्पाच्या खर्च वाढीवरून रिलायन्स इन्फ्राच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये एमएमआरडीए वाद सुरू आहे. ...सविस्तर बातमी
19:26 (IST) 29 Jul 2025

“सत्तेच्या विरोधातील घटकांविरोधात जन सुरक्षाचा वापर”, माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख पक्षाच्या आढावा बैठकीसाठी गडचिरोलीत आले होते. ...अधिक वाचा
19:09 (IST) 29 Jul 2025

आता शेतकरी विधवा महिलांसाठी रामटेक ते नागपूर ‘सिंदूर यात्रा’, बच्चू कडूंची घोषणा

आम्ही रामटेक ते दीक्षाभूमी (नागपूर) ‘सिंदूर यात्रा’ काढणार, दुसरी यात्रा मराठवाड्यात, हिंगोली ते नांदेड काढणार आहोत, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ...सविस्तर वाचा
19:07 (IST) 29 Jul 2025

सरकारी फाईल्स, बारचा टेबल आणि स्वाक्षऱ्या… अखेर रहस्य उलगडले!

नागपूरच्या मनीषनगरमधील बारमध्ये सरकारी फाईल्स घेऊन बसलेले कर्मचारी हे गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची माहिती बाहेर आली. तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. ...सविस्तर वाचा
18:43 (IST) 29 Jul 2025

‘डुबना हैं तो प्यार में डूबो…’ अंधेरी सब वेमध्ये पाणी साचण्यावरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

थोडासा पाऊस पडला तरी लगेचच पाणी भरण्यासाठी प्रसिद्ध असलेला अंधेरी सब वे आता समाजमाध्यमांवरही चेष्टेचा विषय बनला आहे. पाणी तुंबलेल्या अंधेरी सब वेची छायाचित्रे आणि त्यावरील एका ओळीवरून चर्चा रंगली आहे. ...सविस्तर बातमी
18:36 (IST) 29 Jul 2025

उद्धव व राज ठाकरे एकत्र! शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, ‘आम्हाला मत विभाजनाचा फटका…’

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोघांचा एकत्रित फोटोही समाज माध्यमांवर शेअर केला. त्यामुळे हे दोघे एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. ...सविस्तर वाचा
18:26 (IST) 29 Jul 2025

Video : राज्यात कायदा व सुस्वस्थाच नाही; मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असे का म्हणाले?

खामगाव येथील तरुणाला जाती-धर्म विचारुन त्याच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेवरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय अवस्था उघड झाली. ...वाचा सविस्तर
18:22 (IST) 29 Jul 2025

मुंबईत वीजेचा धक्का लागून सहा माकडे जखमी

मुंबईत गेल्या दोन महिन्यांमध्ये शहर, तसेच उपनगरांमध्ये विजेचा धक्का बसून सहा माकडे गंभीर जखमी झाली आहेत. ...सविस्तर बातमी
18:12 (IST) 29 Jul 2025

मनोरुग्णांची उंच भरारी… स्किल इंडिया प्रमाणपत्राने मिळाला जगण्याचा नवा श्वास!”

ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने केंद्र सरकारच्या स्किल इंडिया प्रमाणपत्राच्या माध्यमातून रुग्णांना ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...सविस्तर बातमी
17:57 (IST) 29 Jul 2025

अँडिनो आणि एन्टेरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय! पावसाळ्यात शक्यतो हस्तांदोलन टाळा…

डॉक्टर आणि नेत्ररोगतज्ज्ञांच्या मते अँडिनोव्हायरस आणि एन्टेरोव्हायरस या दोन प्रमुख विषाणूंमुळे डोळ्यांतील संसर्ग झपाट्याने पसरत आहे. विशेषतः व्हायरल कंजंक्टिव्हायटिस या स्वरूपात रुग्ण समोर येत आहेत. ...सविस्तर वाचा
17:57 (IST) 29 Jul 2025

स्वच्छ मेट्रो, कडक नियम; तंबाखू खाणाऱ्यांना लाखाचा दंड

अशा पदार्थांच्या सेवनामुळे अनेकदा थुंकणे व कचरा पसरवणे यासारख्या घटना घडतात, ज्यामुळे मेट्रो परिसरातील स्वच्छतेवर परिणाम होतो आणि इतर प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. ...अधिक वाचा
17:50 (IST) 29 Jul 2025

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या पाडणार! काय आहे कारण…

जिल्ह्यात एकूण तीन हजार ३२४ शाळा आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या दोन हजार ९९ शाळा आहेत. तसेच १४० शासकीय, ६४९ खासगी अनुदानित आणि ४३६ विनाअनुदानित शाळा आहेत. ...सविस्तर वाचा
17:26 (IST) 29 Jul 2025

पाम बीच रोडवर तीन दिवसांत तिसरा अपघात; भरधाव डंपरची कारला धडक, दोन जण जखमी

वाशीतील पाम बीच रोडवर मंगळवारी (२९ जुलै) सकाळी आठच्या सुमारास भरधाव डंपर आणि खासगी कारची भीषण धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले. ...वाचा सविस्तर
17:14 (IST) 29 Jul 2025

जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकास : चार कंपन्यांच्या निविदा

जोगेश्वरीमधील पूनम नगर मेघवाडी येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडा प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून चार कंपन्यांनी तांत्रिक निविदा सादर केल्या आहेत. ...वाचा सविस्तर
16:59 (IST) 29 Jul 2025

पालघर जिल्ह्यात दहावी-बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; दहावीचा २१ टक्के तर बारावीचा ३४ टक्के निकाल

फेब्रुवारी व मार्च २०२४-२५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जून जुलै महिन्यात पार पडली. दहावीच्या फेरपरीक्षेत एकूण १०७८ विद्यार्थी तर बारावीच्या फेरपरीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून एकूण २४६३ विद्यार्थी बसले होते. ...सविस्तर बातमी
16:58 (IST) 29 Jul 2025

५९ सरपंच आरक्षण सोडत रद्द, ३० जुलै रोजी नव्याने प्रक्रिया होणार

मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदींनुसार ही नवीन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
16:47 (IST) 29 Jul 2025

२५ लाखांची निविदा खड्ड्यात, पालघरमध्ये खड्डे कायम, नागरिक संतापले

पालघर पूर्वेकडील काही खड्डे बुजवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी संपूर्ण निधी पूर्वेकडील कामांवर खर्च झाल्याने उर्वरित पालघर पश्चिम भागातील खड्ड्यांसाठी निधीच उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर बातमी
16:34 (IST) 29 Jul 2025

नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पद स्थितीत अल्पवयीन मुलगी - युवक; आरपीएफची योग्य वेळी कारवाई

आता नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ड्युटीवर असलेले प्रधान आरक्षक अंबोरे व आरक्षक नरेंद्र नेहरा यांनी एक अल्पवयीन मुलगी आणि एक युवक संशयास्पद अवस्थेत पाहिले. ...सविस्तर बातमी
16:07 (IST) 29 Jul 2025

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणाले, ४०० पार केले तरी संविधानाची मूळ...

आर.एस. रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड सोशियो-कल्चरल स्टडिज, नागपूर यांच्यातर्फे कामगार केसरी रुईकर स्मृती विशेष चर्चासत्राच्या मालिकेत “समाजवाद व धर्मनिरपेक्षता : भारतीय जनतेच्या आकांक्षापूर्तीचे सूत्र” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ...सविस्तर वाचा
15:44 (IST) 29 Jul 2025

अर्धनग्न अवस्थेत अल्पवयीन मुलाशी केले व्हिडीओ चॅटिंग….गुन्हा दाखल

मुलाच्या आईने दिलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत संबंधित महिलेच्या विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...सविस्तर वाचा
15:36 (IST) 29 Jul 2025

मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गॅस टँकरला भीषण अपघात; गॅस गळतीमुळे महामार्गावरील...

सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात गॅस टँकर २५ फुट दरीत गेल्याने टँकर मधून गॅस गळती सुरु झाली. ...अधिक वाचा
15:27 (IST) 29 Jul 2025

गृहनिर्माण धोरणातून कोळीवाडे, गावठाणे गायब!

मुंबईचा अविभाज्य भाग असलेल्या कोळीवाडे आणि गावठणांच्या पुनर्विकासासाठी नव्या गृहनिर्माण धोरणात काहीही उपाय सुचविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोळीवाडे, गावठणांचा पुनर्विकास अधांतरीच राहिला आहे. ...वाचा सविस्तर

Today’s Mumbai Pune Nagpur News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज २९ जुलै २०२५