Mumbai News Updates, 30 July 2025 : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी छापे टाकले. मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ही ठिकाणे असून नाशिकमधील छाप्यात एक कोटी २० लाख रुपये आढळून आले आहेत. तसेच,‘खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई एकतर्फी आणि विशिष्ट हेतू ठेवून केली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अनेक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Live Updates
Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi : मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूरच्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा सविस्तर...
तीन वर्षांचे भाडे दिल्यानंतरच पुनर्विकास; गृहनिर्माण धोरणातील महत्त्वपूर्ण शिफारस
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात दोन वर्षांचे आगावू भाडे व पुढील वर्षांसाठी धनादेश जमा करण्याची पद्धत रुढ करण्यात आली आहे. आता त्या पुढे जाऊन आगावू धनादेशाऐवजी थेट भाडे जमा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
परवानगीशिवाय चित्रपटाचे चित्रीकरण… मुंबई महापालिका तयार करणार धोरण; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची घोषणा
बॉलिवूडचे अस्तित्व मुंबईत टिकून राहावे आणि चित्रपटांचे चित्रीकरण सहजपणे करता यावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ...वाचा सविस्तर
चहा कॉफीत मापात पाप…..दुधात भेसळ…. आणखी कशात होत आहे तुमची फसवणूक…; तक्रारींसाठी ठरला वार
सिंधुदुर्ग ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे स्थानकातील चहा विक्रेत्यांकडून मापात पाप करत निम्म्याहून कमी चहाची विक्री झाल्याचे प्रकार नुकतेच समोर आले होते. ...सविस्तर वाचा
भिवंडी वाडा मार्गावर खड्ड्यामुळे अपघात
यश मोरे असे या मुलाचे नाव असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला आहे. ...सविस्तर बातमी
पर्यावरणपूरक गणेश मूर्तींंची येवला ते हैद्राबाद अशी धाव; कापसे फाउंडेशनचा पुढाकार
येवला येथील कापसे फाउंडेशन अंतर्गत अहिल्या गोशाळा संस्थेच्या वतीने शेण तसेच मुलतानी मातीसह अन्य सामानाचा वापर करत पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत.
...सविस्तर वाचा
पालघर जिल्ह्यात पहिली कातकरी आश्रमशाळा सुरू, स्थलांतरित मुलांना मिळणार शिक्षणाचा आधार
खर्डी (वसई) इथे कातकरी विद्यार्थ्यांसाठी मंजूर आश्रमशाळा जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या डहाणू तालुक्यातील रानशेत इथे नव्याने सुरू करण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन बुधवार ३० जुलै रोजी करण्यात आले. ...सविस्तर वाचा
पनवेल कर वसुलीतून न्यायप्रविष्ट कालावधीचा वगळा, उर्वरीत कर भरण्याची तयारी...
बुधवारी माजी नगरसेविका आणि खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षांसह त्यांच्या सहका-यांनी बुधवारी महापालिका आय़ुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. ...वाचा सविस्तर
रेड्डी पाठोपाठ माजी आयुक्त पवारही वादाच्या भोवऱ्यात; पालिकेतील आर्थिक घोटाळे बाहेर येण्याची शक्यता
मंगळवारी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ही ईडी ने छापेमारी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा महापालिकेतील आर्थिक घोटाळे समोर आले आहेत. ...अधिक वाचा
ठाणे शहरातील या भागात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळून ९ वाहनांचा चुरडा
बुधवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील रामनगर परिसरात असलेल्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू होते. ...अधिक वाचा
नवी मुंबई : पे अँड पार्कमधून दुचाकी चोरी
नवी मुंबईत वाहन चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पे अँड पार्क मध्येच गाडी लावणे सुरक्षित समजले जाते. मात्र आता पे अँड पार्क मधूनही दुचाकी चोरीची घटना घडली. ...सविस्तर बातमी
नवी मुंबई विमानतळासाठी हजार कोटींची कंत्राटे नेमकी कुणासाठी? मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल….
“ मोक्का लागलेले गुंड आता बिल्डर झाले.., तुमचा मात्र अभिमान वाटतो”, ठाण्यातील काँग्रेस नेत्याने...
अनधिकृत बांधकामांना कुणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असतानाच, त्यावर ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपच्या नेत्यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले आहे. ...अधिक वाचा
व्हॉट्सॲपवर शेअर मार्केट सल्ला घेताय, तर थांबा; व्हॉट्सॲपवरचा सल्ला पडला १३ लाखांना, उल्हासनगरात फसवणूक
उल्हासनगरातील ३१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १३ लाख रूपयांची फुसवणूक झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
मेट्रो कामाच्या बेशिस्तीमुळे कशेळी, काल्हेर, भिवंडीत वाहतुक कोंडी
बुधवारी मध्यरात्री एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अचानक कशेळी येथे कामाला सुरुवात केली. हे काम बुधवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत सुरु राहिले. ...वाचा सविस्तर
भारत पाकिस्तान १९६५ चे युद्ध कसं होतं? ऑपरेशन जिब्राल्टर नक्की काय होते? जाणून घ्या ठाण्यातील या कार्यक्रमात…
१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सैनिकी संघर्ष मानले जाते. या ऐतिहासिक युद्धाबाबतचे विविध पैलू ठाण्यात उलगडले जाणार आहेत. यासाठी ठाण्यात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
शेतकऱ्यांना दिवसा वीज.. जळगाव जिल्ह्यात ८५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प
जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सुमारे ८५० मेगावॅट क्षमतेचा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली. त्यापैकी ६८ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प आतापर्यंत कार्यान्वितही झाले आहेत. ...अधिक वाचा
गणेशोत्सवात मध्य, कोकण रेल्वेवरून धावणार अतिरिक्त ४४ विशेष रेल्वेगाड्या
गाडी क्रमांक ०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी २८ आणि ३१ ऑगस्ट, ४ आणि ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ...अधिक वाचा
फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला पुन्हा धोका?, निवडणूक याचिकेला सर्वोच्च न्यायालयत आव्हान, सरन्यायाधिशांपुढे…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयाने फेटाळली होती.प्रफुल्ल गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
...वाचा सविस्तर
लग्न संस्काराचे इव्हेंन्टमध्ये झालेले रूपांतर चिंतेचे; डोंबिवलीत ‘शुभमंगल सावधान’ परिसंवादातील जाणकारांचे मत
सुनिती रायकर, सई बने, ॲड. तृप्ती पाटील, संगीता पाखले, पूजा तोतला, लीना मॅथ्यू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नेत्रा फडके यांनी सूत्रसंचालन केले. ...वाचा सविस्तर
बदलापूरः ‘त्या’ मृत्यूप्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल...
एका रहिवाशाच्या घरी लग्नकार्य असल्याने त्यांनी विनापरवानगी मंडप सजावटवाल्याला बोलावून सजावटीचे काम केले होते. त्यावेळी विद्युत खांबाला बांधलेल्या लोखंडी तारा तशाच उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. ...अधिक वाचा
ठाण्यातील २८ अनधिकृत इमारतींचा पाणी पुरवठा बंद…कारवाईत २ पंप जप्त, १९ बोअरवेल केल्या बंद
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
जातनिहाय जनगणना… ओबीसी युवा अधिकार मंचकडून मंडल जनगणना यात्रा… हा आहे मार्ग…
केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा यासह इतर मागणीसाठी २ ऑगस्टपासून नागपुरातून विविध जिल्ह्यांत मंडळ जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे
...वाचा सविस्तर
ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची घुसखोरी; पालिकेच्या सीसीटीव्ही, पथदिव्यांची तोडमोड
मालवाहू वाहने ९० फुटी रस्त्यावर आली की त्यांच्या टपाच्या उंचीमुळे या रस्त्यावरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना धक्का लागत आहे. ...सविस्तर बातमी
गोकुळ झाच्या भावाला सोडू नका…तो आमच्या कुटुंबाला घातपात करील; कल्याणमधील पीडित मराठी तरूणीची न्यायालयात मागणी
गेल्या आठवड्यापासून गोकुळ झाचा भाऊ रणजित भुलेश्वर झा याला जामीन मिळावा म्हणून झा कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. ...सविस्तर बातमी
नागपुरातील दंगल मुस्लिमांकडून पूर्वनियोजित, तथ्य संशोधन समितीचा अहवाल
मार्च महिन्यात महाल परिसरात घडलेली दंगल ही मुस्लीम समाजकंटकांकडून पूर्वनियोजित होती.हिंदू समाजाला लक्ष्य करण्यासाठी ही दंगल घडवण्यात आली होती, असा आरोप भारतीय विचार मंचच्या तथ्य संशोधन समितीच्या अहवालात करण्यात आला आहे.
...वाचा सविस्तर
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाण्यात मनसेचे बॅनर
फलकावर “हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल असे लिहिण्यात आले असून, यातून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याच्या धोरणाचा विरोध करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
शालेय विद्यार्थ्यांसाठीची परिवहन समिती कागदावरच… स्कूल व्हॅन चालक आंदोलनाच्या…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीसाठीची शिक्षक व पालकांचा समावेश असलेली परिवहन समिती फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात कोणताही पालक वा शिक्षक येऊन व्हॅनची तपासणी करत नाही. ...सविस्तर बातमी
प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता : इंटरसिटी सुपरफ़ास्ट एक्सप्रेस आरक्षित चार डबे
राज्याची उपराजधानी नागपूर आणि अमरावतीला जोडणारी अजनी-अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेसचे हे डबे आता प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत. प्रवाशांना आता अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
...वाचा सविस्तर
जय जवान गोविंदा पथक ‘प्रो - गोविंदा’च्या तिसऱ्या पर्वातून बाहेर, सविस्तर वाचा नेमके काय झाले ?
‘प्रो - गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची प्राथमिक फेरी २८ व २९ जून रोजी ठाणे (पश्चिम) येथील दिवंगत बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे पार पडली. ...सविस्तर वाचा
स्वावलंबन प्रमाणपत्रामुळे स्वमग्न विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोंधळ; दहावी, बारावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही
स्वावलंबन प्रमाणपत्रावर स्वमग्न विद्यार्थ्यांची नेमकी गरज व त्यानुसार आवश्यक सवलती नमूद नसल्याने त्या कशा उपलब्ध केल्या जाणार याबाबत राज्य मंडळाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...सविस्तर वाचा
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ३० जुलै २०२५