मुंबई : केईएम रुग्णालय आणि सखी चार चौघी या बिगर सरकारी संस्थेने संयुक्तरित्या तृतीयपंथींसाठी मूत्रविज्ञान विभागामार्फत विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. मूत्रविज्ञान विभागाच्या आठव्या मजल्यावर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दर शनिवारी दुपारी ३ वाजता हा विभाग कार्यरत असणार आहे.

हेही वाचा – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू

हेही वाचा – वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार, प्रवेशासाठी ३९ हजार विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृतीयपंथींना आरोग्य सेवा मिळवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये लिंग शस्त्रक्रिया करणाऱ्यांसाठी बराच त्रास सहन करावा लागतो. तृतीयपंथीय महिलांना शस्त्रक्रियेनंतर मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रमार्गातील गुंतागुंत आणि लघवीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. तर पुरुषांना मूत्रमार्गातील कडकपणा, फिस्टुला आणि मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका यासारख्या गुंतागुंतांचा सामना करावा लागतो. मात्र तृतीयपंथींयांकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे त्यांना आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन तृतीयपंथींना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या वाढवणे, तृतीयपंथीयांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, यासाठी केईएम रुग्णालयाने हा विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.