संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत रविवारी ‘माझा डॉक्टर’ परिषद

राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून करोना राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे उद्घाटन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख  उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

http://www.facebook.com/onemdhealth  यावर प्रश्न पाठवता येतील. परिषदेत  राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. ही cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक व युट्युब https://youtube.com/CMOMaharashtra वरुन देखील पाहता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: My doctor conference on sunday about a possible third wave akp