VIDEO: हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा खून – जितेंद्र आव्हाड

आंदोलनकर्त्यांना भेटण्याचीही परवानगी मिळणार नसेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

द हिंदू दैनिकाचे पत्रकार आलोक देशपांडे यांना धक्काबुक्की करणारे पोलीस उपनिरीक्षक धनंजय घनगे यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. विधानभवनाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.

आलोक देशपांडे मंगळवारी आझाद मैदानात नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी आलोक देशपांडे यांना पोलीस उपनिरीक्षक धनंजय घनगे यांनी अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली. त्यांना मारहाण करण्यापर्यंत घनगेंची मजल गेली होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हा वृत्तपत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे असे आव्हाड म्हणाले. सरकारच्या आदेशावरुन पोलिसांनी असे करायचे ठरवले. आंदोलनकर्त्यांना भेटण्याचीही परवानगी मिळणार नसेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकार हमसे डरती हैं, पोलिसको को आगे करती हैं  ही आम्ही घोषणा देतो त्यात काय चुकीचे आहे असे आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही  या घटनेचा निषेध करतो. ज्या उपनिरिक्षकाने हात उगारला त्याची सरकारने त्वरित बदली करावी, निलंबन करावे अशी मागणी आव्हाड यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader jitendra avhad demand resignation of police sub inspector dhananjai ghange

ताज्या बातम्या