मी टिपू सुलतानविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा. राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला दिला आहे. दरम्यान ज्याप्रकारे वाद निर्माण केला जात आहे, वातावरण दुषित केले जात त्यावरुन टिपू सुलतानचा अपमान केला जात आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपाचे नेते येदुराप्पा हे टिपू सुलतानची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला असेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानला धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही असं भाषण केलं होतं याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपाला करुन दिली आहे.

टिपू सुलतानवरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिपू सुलतान इंग्रजासमोर शरण गेला नाही. जी व्यक्ती इंग्रजासमोर झुकली नाही त्याच्या नावावर वाद उभा केला जात आहे, हे राजकारण असून प्रविण दरेकर हे मजुर सोसायटीचे कामकाज नाही. इतिहास समजना आपके बस की बात नही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.