Mumbai News 2 June 2025 : प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली असून, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारतात केरळ, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. आता चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथे प्रवास करणे टाळा, असा सल्ला पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. तर सदाशिव पेठेतील भावे स्कूलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात मोटारचालकाला विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत आरोपी मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले आहे.
तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे शहर आणि परिसर, नागपूर शहरामधील विविध घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल…
Pune Mumbai Nagpur Breaking News, 2 June 2025
नुकसान भरपाई रक्कम मिळवण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू; पालकमंत्री यांनी आढावा बैठकीत दिली ग्वाही
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सात आमदार फुटले, 'पेरले तेच उगवले' विरोधीपक्षाची टीका
गडचिरोली : सुपीक जमिनी उद्योगांना देण्यावरून जिल्ह्यात असंतोष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर… दहा हजार प्रवाशांमागे अवघा एक पोलिस, रेल्वे पोलीस दलात मनुष्यबळाचा अभाव
विषमुक्त कापडास नैसर्गिक रंगाचा साज, या सेंद्रिय कपड्यांना अमेरिकेची पसंती
एटीएसच्या कारवाईनंतर पडघ्याचा साकीब नाचण पुन्हा चर्चेत
पुलाचे कठडे तोडून कार खाली कोसळली; तिघांचा दुदैवी अंत
अनेक शाळा शिक्षकाविना; संचमान्यता चुकल्याचा शिक्षक समितीचा आक्षेप
माजी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात अनागोंदी
मोठी घडामोड : शिक्षक घोटाळ्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल…
भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या अभिप्राय पद्धतीवर प्रश्नचिन्ह, सर्वाधिक अभिप्राय मिळालेल्यांना डावलले
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दाभाडी काँग्रेसने पुन्हा आणले चर्चेत !
कल्याणमधील ५८ नागरिकांची नाशिकच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपनीकडून फसवणूक
पुणयात टोमॅटो, फ्लाॅवर, वांगी, ढोबळी मिरची, शेवगा महाग
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर प्रवासी तरुणाची लूट
पुण्यातील खराडी भागात महिलेची ‘ऑनलाइन टास्क’चे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक
पुण्यातील धनकवडी भागात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यातील बेलबाग चौकात महिलेच्या पिशवीतून तीन लाखांचे दागिने लंपास
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात दोन शहराध्यक्ष
राज्यभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात! मुंबई, पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणीही संसर्गात मोठी वाढ
कल्याणमधील उंबर्डेत स्वच्छतागृह बांधण्यावरून तरूणावर तलावारीने हल्ला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम, आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली असून, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
वाचा सविस्तर...
विदेशवारीत सावधगिरी ! करोनामुळे पाच देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांचा इशारा
चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथे प्रवास करणे टाळा, असा सल्ला पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. जर प्रवास करणे अटळ असेल, तर मुखपट्टी, सामाजिक अंतर आणि वारंवार हातांची स्वच्छता या शिफारशींचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात येत आहे.
मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न, कोठडीत रवानगी, पुण्यातील भावे स्कूलजवळील अपघात प्रकरण
पुणे : सदाशिव पेठेतील भावे स्कूलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात मोटारचालकाला विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत आरोपी मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले आहे.
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे