लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः बोरिवली पूर्व येथे राहत्या घरी तरूणीने गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सनी कुशाळकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने मृत तरूणीला धमकावले, तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे घेतल्याची तक्रार तिच्या बहिणीने कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे केली आहे.

या तरूणीने ३ एप्रिल रोजी राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत तरूणीला सनीने बदनामी करण्याची धमकी देऊन आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार कस्तुरबा मार्ग पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर बुधवारी रात्री कस्तुरबा मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३८६ (खंडणी), ३८७ (जबरदस्तीने पैसे वसूल करणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा… मुंबईः अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार आरोपीने मृत तरूणीकडून १० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.