मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल सेवा विलंबाने धावतील.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीमध्ये माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांत थांबतील. तर, नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकांत लोकलचा थांबा नसल्याने येथील प्रवाशांचे ब्लॉककाळात हाल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – बेलापूर / पनवेल लोकल सेवा आणि पनवेल – ठाणे लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉककाळात सीएसएमटी – वाशी, ठाणे – वाशी / नेरुळ, बेलापूर / नेरुळ ते उरण लोकल सेवा सुरू असतील.

हेही वाचा…शुल्कमाफीनंतर अंबानी रुग्णालयाला भूखंड ? अंधेरीतील अडीच एकरच्या भूखंडावरील आरक्षण हटवण्याच्या हालचाली

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही चर्चगेट लोकल वांद्रे आणि दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.