मुंबई : नांदेड विशेषे ट्रेनमध्ये एका चोराने डॉक्टर दाम्पत्यवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत डॉक्टर दाम्पत्य ट्रेनमधून खाली पडून गंभीर जखमी झाले. यात डॉक्टर योगेश देशमुख यांचा डावा हात तुटला. चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची मागील चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे.डॉ. योगेश देशमुख (५०) आणि डॉ. दिपाली देशमुख (४४) हे दाम्पत्य पनवेल येथे राहतात.

देशमुख यांचे पनवेलमधील कामोठे येथे सदगुरू कृपा आयुर्वेद रुग्णालय आहे. देशमुख दाम्पत्य ९ वर्षांची मुलगी श्रध्दा समेवत बुधवारी नांदेड येथे नातेवाईकाकाडे जाण्यासाठी निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथून त्यांनी मध्यरात्री १ ची एलटीटी – नांदेड विशेष ट्रेन पकडली. तिघे जण एस-४ बोगीत चढले. दिपाली देशमुख मधल्या सिटवर झोपल्या होत्या. त्यांचे पती योगेश हे वरच्या सीटवर आणि मुलगी श्रध्दा समोरील सीटवर झोपली होती. मध्यरात्री एक अनोळखी इसम ट्रेनमध्ये शिरला. पहाटे ३.३० च्या सुमारास त्याने डॉ. दिपाली देशमुख यांच्या खाद्यावरील पर्स खेचण्याच्या प्रयत्न केला. दिपाली यांनी त्याला प्रतिकार केला. या खेचाखेचीत त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना ट्रेनमधून खाली खेचले आणि त्या खाली पडल्या. तो गोंधळ पाहून डॉ. योगेश उठले, पण पत्नी दिपाली खाली पडल्याचे बघताच त्यांनी ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यात त्यांचा डावा हात तुटून खाली पडला.

याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३०९ (४) आणि ३०९(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोराच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील ४ दिवसातील दुसरी घटना

जयपूर वांद्रे एक्स्प्रेसमध्ये अंधेरीजवळ चालत्या गाडीत शनिवार, २ जून रोजी चौघांनी दरोडा घातला. त्यांनी एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले. यावेळी या दाम्पत्याने त्यांना जोरदार प्रतिकार केला, मात्र आरोपी त्यांच्याकडील ७ लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग पळवून नेण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात कलम ३०९ (४) आणि ३(५) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.