मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) ठाण्यात हाती असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी घेतला. यावेळी शिंदे यांनी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यासह ‘एमएमआरडीए’मधील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा- दसरा मेळाव्यानिमित्त मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”

‘एमएमआरडीए’ने ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो, भूमिगत मार्ग, सागरीमार्ग असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांच्या कामांचा आढावा शिंदे यांनी घेतला. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २०.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी सायस्त्रा या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात होणे अपेक्षित आहे. लवकरात लवकर निविदा काढून या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना यावेळी शिंदे यांनी ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा- सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ

मेट्रोसह कल्याण रिंग रोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठागाव ठाकुर्ली – माणकोली खाडीपूल आणि ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचाही शिंदे यांनी यावेळी आढावा घेतला. नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या ऐरोली – कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.