मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर यांच्यात अडीच तास खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

काय म्हणाले सिद्धार्थ मोकळे?

“प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली भेटी ही इंदू मिल संदर्भात होती. या स्मारकाची संकल्पना आणि तिथे जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र उभं राहावं, अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली होती. विविध समितांच्या अहवालानंतर जी माहिती पुढे आली आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. भाजपाबरोबर किंवा भाजपा बरोबर असेलल्या कोणत्याही पक्षाबरोबर आम्ही युती करणार नाही. त्यामुळे आम्ही शिंदे गटाबरोबर जाणार का? याबाबत ज्या चर्चा सुरू आहे, त्याला पूर्ण विराम मिळाला पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर यांच्यात अडीच तास खलबतं झाल्याची चर्चा; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “सर्व पक्षांना घेऊन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना, “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच्या युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही फक्त जाहीर होण्याची औपचारिकता बाकी आहे. हे देखील बाळासाहेबांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे या चर्चा खोट्या आहेत. राजकारणात मुख्यमंत्री हे पद पक्षविरहीत समजले जाते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.