मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल | women gangrape in mumbai kurla three booked | Loksatta

मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील कुर्ला येथे धक्कादायक घटना घडली आहे.

mumbai kurla gangrape
सांकेतिक फोटो

मुंबईतील कुर्ला येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन जणांनी एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसा आरोप पीडित ४२ वर्षीय महिलेने केला असून याबाबत महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही घटना बुधवारी या महिलेच्या घरी कोणीही नसताना घडली. घरी कोणीही नसल्याचे हेरत आरोपी या महिलेच्या घरात घुसले. त्यांनी या महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून पोलिसांकडे गेली तर हे व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी या महिलेला देण्यात आली.

हेही वाचा >>> नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल

दरम्यान, या महिलेने अत्याचारादरम्यान मारहाण केल्याचाही दावा केला आहे. धारदार शस्त्रांनी मला मारण्यात आले असून माझ्या शरीरावर जखमा आहेत, असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:01 IST
Next Story
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे पोलिसांनी केलेले नियोजन अयशस्वी; ये-जा करण्याचे मुख्य मार्गच बंद