News Flash

मुद्रांकाचा काळा बाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार

जिल्ह्यत सध्या ५५ विक्रेते कार्यरत आहेत. त्यांना ३० हजारापर्यंत मुद्रांक पेपर विक्री करण्याची मर्यादा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

नागपूर : नागपूर जिल्ह्यतील मुद्रांक विक्रेत्यांसंदर्भात (स्टँम्प वेंडर) मोठय़ा प्रमाणात आलेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या विरोधात कठोर पाऊल उचलत काळाबाजार करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुद्रांक वाटपाचा तपशील संकेतसथळावर जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यत सध्या ५५ विक्रेते कार्यरत आहेत. त्यांना ३० हजारापर्यंत मुद्रांक पेपर विक्री करण्याची मर्यादा आहे. अन्य मुद्रांक विक्री मोठय़ा प्रमाणात ई-चलानच्या माध्यमातून ऑनलाईन केली जाते. छोटय़ा विक्रेत्यांना केवळ १०० व ५०० रुपये किंमतीचे मुद्रांक विकण्याची मुभा आहे. मात्र गेल्या काही अधिक दराने मुदांक विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे आज सर्व मुद्रांक विक्रेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बचत भवनात पाचारण केले होते. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्रांक विक्रेत्यांची बैठक घेतली. अधिक दराने मुद्रांक विकल्यास किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे व पोलीस कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर विक्रेत्यांच्या नावापुढे त्यांना देण्यात आलेल्या मुद्रांक पेपरची नोंद करावी, असे सांगितले. यावेळी मुद्रांक विक्रेत्यांसोबत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर.बी. मुळे, वरिष्ठ कोषागार अधिकारी अरविंद घोडे, मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील व इतर पदाधिकारी तसेच पोलिस उपअधीक्षक सुधीर नंदनवार उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 2:55 am

Web Title: district collector to take action on stamp vendor against large number of complaints zws 70
Next Stories
1 पाकिस्तान, अफगाणिस्तानसह विदेशातील नागरिकांची पडताळणी
2 संपत्ती, भूखंड बळकावण्याचे प्रकार वाढले!
3 दाभाडकरांना घरी नेण्याचा निर्णय नातेवाईकांचाच!
Just Now!
X