नागपूर : जिल्ह्यात बुटीबोरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे भावी मुख्यमंत्री, असे फलक लावण्यात आल्यामुळे आता शहर व जिल्ह्यामध्ये राजकीय वतुर्ळात या फलकाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडी बघता राज्याच्या मुख्यमंत्रीवरून चांगली चर्चा सुरू असताना नागपुरात बुटीबोरी भागात भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष व फडणवीस यांचे समर्थक असलेले बबलू गौतम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बुटीबोरी चौकात मोठे फलक लावले आहे. या फलकामुळे ग्रामीण व शहरात या फलकाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा – अमरावती : धक्कादायक! प्रेयसीचे आक्षेपार्ह छायाचित्रे व चॅटिंग नियोजित वराला पाठवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फलकावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह बबलू गौतम यांचे छायाचित्र आहे. याबाबत बबलू गौतम यांच्याशी संवाद साधला असता देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे. मात्र, भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहणार आहे. त्यामुळे आम्ही बुटीबोरी चौकात असे फलक लावले असल्याचे ते म्हणाले.