उन्हाच्या झळा सुरू होताच वाघ व बिबट्या शहरात प्रवेश करित असल्याच्या घटन समोर येत आहे.ऊर्जानगर मार्गावरील वृंदावन नगरातील सज्जनवार यांच्या घरात बिबट्याने प्रवेश करून मॅगी नावाच्या कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याने हा हल्ला परतवून लावत भुंकल्याने बिबट धुम ठोकत जंगलाच्या दिशेने पळाला. सिंदेवाही तालुक्यात बिबट्याने एकाच्या घरात घुसून ठाण मांडले होते. या घटनेनंतर रविवारी सायंकाळी चंद्रपुरातील वृंदावन नगरात बिबट्याने प्रवेश केला. तिथे सज्जनवार यांच्या घरात बिबट प्रवेश करताच मॅगी नावाचा कुत्रा अंगणात बसलेलाच होता. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला.
हेही वाचा >>>“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”
बिबट्याचा हल्ला परतवून लावत कुत्र्याने भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज इतका मोठा होता की बिबट्याने आल्या पावलीच जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. त्यामुळे अनुचित घटना घडली नाही. चंद्रपूर शहराच्या चौफेर जंगल आहे. एका बाजूला तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प् आहे. या प्रकल्पातून सातत्याने वाघ, बिबट, अस्वल तथा अन्य वन्यप्राणी शहरात येतात. दुर्गापूर व ऊर्जानगरात तर बिबट्याने धुमाकूळ घालत लहान बालिकेपासून मोठ्यांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात या परिसरात आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा सुरू होताच वन विभागाने कार्यतत्परतेने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, बंदोबस्त तैनात ठेवावा अशी मागणी होत आहेे.