भंडारा : रागाच्या भरात घरून निघून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर भंडारा शहर परिसरात २७ आणि २८ जून असे सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्या प्रकरणात भंडारा पोलीस ठाण्यात ५ आरोपींना अटकही करण्यात आली होती. मात्र यात आणखी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे.  पीडित अल्पवयीन मुलीवर दोन दिवस नव्हे तर तिसऱ्यांदा ३० जून रोजीही तिच्यावर पुन्हा सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.

या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची संख्या आता १० एवढी झाली असून ९ आरोपी अटकेत आहेत. आरोपी साहील उर्फ बाबा रविंद्र वाघमारे वय २५ वर्षे, इंदीरा गांधी वार्ड, शब्दास उर्फ बच्चा शाईद शेख, वय २१ वर्षे, टंडण वार्ड खामतलाव चौक, विकास उर्फ घोड़ी मानकर वय २३ वर्षे, लाला लजपतराय वार्ड , रवि विनायक बोरकर वय २५ वर्षे, लालबहादुर वार्ड, सर्व रा. भंडारा  सोहील मेश्राम वय अंदाजे २१ वर्षे, रा. मुंबई अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> “प्राध्यापकाचा गळफास, फरशीवर रक्ताचे डाग अन्…”; पोलिसांनी अखेर आरोपींना गाठलेच…

प्राप्त माहितीनुसार , या पीडित अल्पवयीन मुलीची मैत्री तिच्या वर्गमैत्रिणीच्या फेसबुक फ्रेंड सोबत झाली. हा फेसबुक फ्रेंड मुंबई येथे राहतो. पीडित मुलीने त्या मित्राला फोन करून फोन करून तिला डान्स शिकण्याची आवड असल्याचे सांगीतले. एवढेच नाही तर आई वडील डान्स क्लास लावण्यास नकार देत असून माझे शाळेत जाणे बंद केल्याचेही मित्राला सांगितले.  तेव्हा त्याने तिला ‘मुंबईला ये मी तुला डान्स क्लास लावुन देतो’ असे सांगितले. तो तिला वरठी स्टेशन वर घ्यायला येईल असे वचनही त्याने दिले. त्यामुळे ती २७ जून रोजी घरून निघून भंडारा बस स्थानकावर आली. तेथे तिला एकटी असल्याचे पाहून फुस लावून काही तरुणांनी रूम वर नेवून २७ आणि २८ असे दोन दिवस तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दिनांक २९ रोजी ती पुन्हा भंडारा बस स्थानकावर बसली असताना इतर दोन तरुण तिच्याजवळ येऊन तिला विचारपूस करू लागले.

हेही वाचा >>> धक्कादायक! भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार; १५ दिवसांनंतर पीडितेची पोलिसांत तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पहाटे दिनांक ३० जून रोजी पहाटे आरोपींपैकी एकाने तिला बस स्थानकावर सोडून दिले. घडलेल्या प्रकारानंतर ती वरठी रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरीता निघाली मात्र रेल्वे स्टेशन जाण्याचा रस्ता न समजल्यामुळे ती पुन्हा बस स्थानकावर सकाळी ९ वाजता परत आली आणि बसने वरठी रेल्वे स्टेशनला गेली.  तेथून तिने तिच्या मित्राला फोन करून स्टेशनला वाट पाहत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने तिला रेल्वेने मुंबईला येण्यास सांगितले. दुपारच्या ट्रेनने ती अल्पवयीन मुलगी मुंबईला गेली. ९ जूलैपर्यंत ती तिच्या मित्राच्या रूमवर राहिली. मुंबई येथे मित्रासोबत एका बगीच्यात फिरत असताना अड्याळ पोलीस आणि तिच्या वडिलांनी तिला शोधून काढले आणि स्वागवी परत आणले.