लोकसत्ता टीम

गडचिरोली: दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी मिळून अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. रोशन गोडसेलवार (२३ रा. आलापल्ली) आणि निहाल कुंभारे (२३) अशी आरोपींची नावे आहे.

एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत दहावीला होती. नुकताच दहावीचा निकाल लागल्याने प्रमाणपत्र घेण्यासाठी ती शनिवारी शाळेत गेली होती. त्यानंतर एका ओळखीतल्या मुलाने तिला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेले. संध्याकाळी दोन्ही आरोपींनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला व आलापल्ली येथील चौकात सोडून दिले.

हेही वाचा… येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर

भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची काही लोकांकडे वाच्यता केली. मात्र, कुणीही तिला प्रतिसाद दिला नाही. काहींनी तर तक्रार न करता तू घरी जा, असा सल्ला दिला. त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. एटापल्ली पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून घेत प्रकरण अहेरी पोलिसांकडे वर्ग केले.

हेही वाचा… चंद्रपूर : महर्षी कर्वे महिला ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – सुधीर मुनगंटीवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहेरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आरोपींना अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक आरोपी बजरंग दलाचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.