नागपूर : दोन आठवड्यापासून शेतकरी प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा झालेली नाही. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अन्यथा हे अधिवेशन सहल ठरेल, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

विधान भवन परिसरात मिटकरी म्हणाले , आमचा आरोप आहे की शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आग्रही नाही. हरितक्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईकांनी विविध योजना राबविल्या होत्या. हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा ही नाईकांची अपेक्षा होती. परंतु नागपूर अजूनही मागास आहे. अशात नागपुरात अधिवेशन होते आणि त्यात विदर्भावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले.उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सरकार उद्या पॅकेज घोषणा करणार. मात्र, हे सरकार केवळ घोषणा करते. अंमलबजावणी करीत नाही. अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांना ‘थर्टीफस्ट’ साजरे करण्याची घाई झाली असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: “तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा वारसदार म्हणून…”, भास्कर जाधवांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे. तुम्ही सत्तेत आल्यावर मुंबईचे का होता? एकदा तुम्ही प्रतिज्ञा केली होती की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. विदर्भामुळे हे राज्य पोसले जाते. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी मिटकरी यांनी केली.