यवतमाळ : वैद्यकीय शिक्षणाकडे पालकांचा ओढा बघून वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत डमी उमेदवार बसवून गैरप्रकार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड यवतमाळ पोलिसांनी केला. ‘नीट’ परीक्षेकरिता जागोजागी डमी उमेदवार बसवून आंतरराज्यीय रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

वैद्यकीय पूर्व परीक्षा शिकवणी वर्गांसाठी पुढे आलेल्या नांदेड येथील शिकवणी वर्गातील दोघेजण या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहेत. अटक केलेल्यांमध्ये राजस्थान येथील तिघाजणांसह झारखंड येथील व पालघर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यवतमाळ येथील धामणगाव मार्गावरील एका इंग्लिश मीडियम स्कूलचे लिपिक कार्तिक सुभाष कऱ्हे यांनी ७ मे २०२३ रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती. ७ मे रोजी त्यांच्या शाळेत एनटीए दिल्लीमार्फत ‘नीट’ची परीक्षा होणार होती. त्याकरिता एनटीए दिल्ला यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन व चेहरा पडताळणी करणाऱ्या इनोव्हेटिव्ह प्रा. लि. चे प्रमुख पवन रमेश डोंगरे यांच्याकडून उमेदवारांची ओळख पटविण्यात आली होती.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

हेही वाचा – रेल्वेच्या भुसावळ विभागाला सप्टेंबरमध्ये तब्बल १३४ कोटींचे उत्पन्न

ओळख पटविल्यानंतर ही माहिती एनटीए दिल्लीला पाठविण्यात आली. यावर उमेदवार आकार चंद्रकांत पाटील (रा. कोपरी, जि. पालघर) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाची फेरतपासणी करण्याच्या सूचना आल्या. त्यानुसार पुन्हा तपासणी केली असता, वरील दोन उमेदवारांच्या नावावर जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी (२२, रा. घुगल, बिकानेर, पो. नया शहर ठाणा, राजस्थान) आणि महावीर सिखरचंद नाई (रा. गया शहर, पाबू चौक बिकानेर, राजस्थान) या दोघांनी परीक्षा दिल्याचा प्रकार पुढे आला. त्यांनी बनावट प्रवेशपत्र तसेच बनावट आधार कार्ड तयार करून त्याद्वारे नीटची परीक्षा देऊन शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली. त्यावरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी हे प्रकरण तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित कले. स्थानिक गुन्हे शाखेने डमी उमेदवार जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी व महावीर सिखरचंद नाई या राजस्थानातील दोघांना अटक केली. या दोघांकडून सविस्तर विचारपूस केली. त्यानंतर गुन्ह्यातील इतर आरोपींची नावेही पुढे आली. त्यानुसार आकार चंद्रकांत पाटील (रा. कोपरी, जि. पालघर), गजानन मधुकर मोरे (३६, रा. नांदेड), नागनाथ गोविंद दहीफळे (४२, रा. नांदेड) राजीव रामपदारथलाल कर्ण (४४, रा. झारखंड), नरेश बलदेवराम बिष्णोई (२२, रा. जोधपूर, राजस्थान) या पाचजणांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतीश फुके आदींनी सायबर सेलच्या सहकार्याने पार पाडली.

हेही वाचा – पदवीधरांनो त्वरा करा, केंद्र सरकारच्या या विभागात ९० हजार पगाराची नोकरी, अनेक जागांवर भरती

बिष्णोईवर दिल्लीमध्येही गुन्हा

यवतमाळ पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी जितेंद्र गाठचौधरी, महावीर नाई, नरेश बलदेवराम बिष्णोई हे तिघेही दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षणक्रमाचे विद्यार्थी आहेत. तर गजानन मधुकर मोरे व नागनाथ गोविंद दहीफळे हे दोघे नांदेड येथे नीट परीक्षेकरिता घेण्यात येणाऱ्या खासगी वर्गाशी संबंधित आहेत. हे सर्वजण नीट परीक्षेकरिता डमी उमेदवार बसवून आंतरराज्यीय रॅकेट चालवित असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, यातील नरेश बिष्णोई याच्यावर याच पद्धतीचा गुन्हा दिल्ली येथेही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.