नागपूर : भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ४ मार्चला नागपुरात आयोजित करण्यात आले असून त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातून एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन कुठे घ्यायचे यासाठी दोन राज्यांमध्ये स्पर्धा होती.अखेर महाराष्ट्रातील नागपूर शहराची निवड करण्यात आली असे, भाजयुमोचे रोहित पारवे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन होत असून त्यात देशभरातून लाखो कार्यकर्ते नागपुरात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या रविनगर मैदानावर हे अधिवेशन होणार असून त्याला भाजपाचे युवा नेते सूर्या, सुनील बंसल, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मोठे नेते अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा…पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार असल्याने भाजयुमोने अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे .अधिवेशनासाठी प्रथम यशवंत स्टेडियम निश्चित करण्यात आले होते. पण नियमाची अडचण आल्याने व शहरात मोठे मैदान नसल्याने अधिवेशनासाठी विद्यापीठ परिसराची निवड करण्यात आली. तेथे मोठा मंडप टाकण्यात येणार आहे . या संदर्भात गुरूवारी तेजस्वी सुर्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देणार आहे.

हेही वाचा…नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…

यापूर्वी २००९ मध्ये भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात झाले होते. देशभरातील नेते नागपुरात आले होते. पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपच्या युवा शाखेच्या म्हणजे भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होत आहे