नागपूर : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे १८ विशेष ट्रेन चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर – ६ सेवा, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव – ४ सेवा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर – २ सेवा, पुणे ते नागपूर – ६ सेवाचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष ट्रेन (२ सेवा) : विशेष ट्रेन ०९.०८.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन १०.०८.२०२५ रोजी नागपूर येथून १४.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय, २ द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन डबे राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष ट्रेन (४ सेवा) : विशेष ट्रेन १५.०८.२०२५ आणि १७.०८.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन १५.०८.२०२५ आणि १७.०८.२०२५ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा) या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा थांबे असतील. या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय, २ द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर विशेष ट्रेन (२ सेवा) : विशेष ट्रेन दि. ८.०८.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून २२.३० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी १०.१५ वाजता पोहोचेल. (१ सेवा) कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन १०.०८.२०२५ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून १६.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल. या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन असेल. लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – मडगाव विशेष ट्रेन (२ सेवा) : विशेष ट्रेन १४.०८.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विशेष ट्रेन १५.०८.२०२५ रोजी मडगाव येथून १३.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबेल.

या गाडीला १ प्रथम वातानुकूलित, ३ वातानुकूलित द्वितीय, ७ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, १ पॅंट्री कार आणि १ जनरेटर कार असेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – मडगाव विशेष गाड्या (२ सेवा) : विशेष ट्रेन दि. १६.०८.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विशेष ट्रेन १७.०८.२०२५ रोजी मडगाव येथून १३.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

पुणे – नागपूर विशेष ट्रेन (२ सेवा) : विशेष ट्रेन ८.०८.२०२५ रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

नागपूर – पुणे विशेष ट्रेन १०.०८.२०२५ रोजी नागपूर येथून १३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.२० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबेल.

या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन असतील.

पुणे – नागपूर विशेष ट्रेन (४ सेवा) : विशेष ट्रेन १४.०८.२०२५ आणि १६.०८.२०२५ रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

नागपूर ते पुणे विशेष ट्रेन १५.०८.२०२५ आणि १७.०८.२०२५ रोजी नागपूर येथून १६.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०७.२० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबेल. या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन असेल.