लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यात सूर्य आग ओकू लागला असून कमाल तापमानसह किमान तापमानाचा पारा देखील झपाट्याने वर चढत आहे. त्याचवेळी भारतीय हवामान खात्याकडून देशाच्या काही भागात पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नव्हता. मात्र, आता राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या २४ तासात देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “२३ नोव्हेंबरला राज्यात बॉम्ब फुटणार”, मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला इशारा
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
new method developed to find out connection between building material and temperatures
बांधकाम साहित्य आणि तापमानांचा संबंध शोधणारी नवी पद्धत विकसित, काय आहे पद्धती वाचा…

देशासह राज्याच्या काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम म्हणून येत्या २४ तासात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस उष्णतेच्या झळांपासून दिलासा देईल असे वाटत असले तरीही राज्यात तापमानाचा पारा४१ अंश सेल्सिअस वर गेला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे हा पाऊस उन्हाच्या झळांपासून कितपत दिलासा देईल याबाबत साशंकता आहे.

आणखी वाचा-नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!

भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासात छत्तीसगड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, उत्तर ओडिशा, पूर्व झारखंडसह पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.