scorecardresearch

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

शेतामध्ये निंदण करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आवळगाव शेतशिवारात आज मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

शेतामध्ये निंदण करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आवळगाव शेतशिवारात आज मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली.ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील धृपता श्रावण माेहुर्ले (५५) या शेतात काम करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा >>> विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार – राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

वाघाने त्यांना जंगलातील कक्ष क्र.११३८ मध्ये फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी शोध घेतला असता महिलेच्या चपला आढळून आल्या. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाेधमाेहीम सुरू केली. घटनेच्या दीड तासानंतर महिलेचा मृतदेह कक्ष क्र.११३८ मध्ये आढळून आला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या