नागपूर: नवरात्रोत्सवात सोन्याच्या दरात खूपच चढ- उतार बघायला मिळत आहे. गेल्या दोन- तीन दिवसांत सोन्याने चांगलीच उसळी घेतली असून प्रथमच दर प्रती दहा ग्राम ६१ हजार रुपयाहून जास्तवर गेले आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता सराफा व्यवसायीकांकडून वर्तवली जात आहे.

नागपुरातील सराफा बाजारात २१ ऑक्टोबरच्या सकाळी १०.४६ वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६१ हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५८ हजार रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७३ हजार ७०० रुपये होते.

हेही वाचा… रेशनचा तांदूळ जातो तरी कुठे? तहसीलदारांनी छापा टाकला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे दर १७ ऑक्टोबरच्या दुपारी साडेबारा वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७१ हजार ८०० रुपये होते. दरम्यान सध्या आंतराष्ट्रीय स्थिती बघता सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवली.