नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी रात्री दुसरी यादी जाहीर केली असून दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दक्षिण नागपुरातील जागावाटपाचा तिढा निकाली निघाला आहे.
काँग्रेसने पहिल्या यादी ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आज उर्वरित जागासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीसोबत शुक्रवारी चर्चा झाली. त्यानंतर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत दक्षिण नागपूरचा तिढा सुटला आणि गिरीश पांडव यांना उमेदवारी मिळाली. या जागेवर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) दावा केला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. आजच्या बैठकीत त्यावर तोडगा निघाला. या जागेसाठी काँग्रेसमधील दोन-तीन नेते इच्छुक होते. परंतु गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेल्या गिरीश पांडव यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा… भाजपच्या प्रचार गीतात फ़डणवीस ‘आधुनिक अभिमन्यू’, शरद पवार ‘दुर्योधन’
नागपूर ग्रामीणमधील जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पहिल्या यादीत ग्रामीण मधील एकही नाव नव्हते. आज सावनेर-अनुजा केदार, कामठी-सुरेश भोयर, हिंगणा-कुंदा राऊत, उमरेड-रश्मी बर्वे यांच्या नावे जाहीर करण्यात आली.
हे ही वाचा… चावडी : बिनधास्त नाना
राहुल गांधींची महाराष्ट्राच्या नेत्यांवर नाराजी
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मित्रपक्षाशी वाटाघाटी करताना महाराष्ट्रातील नेत्यांनी योग्य भूमिका बजावली नाही. मुंबई आणि विदर्भात पक्षाला अपेक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्याबाबत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात उमेदवारी देताना ओबीसीतील वंचित घटना उमेदवारी देण्याची सूचना केली. त्यानंतर राहुल गांधी हे बैठकीतून निघून गेले. दरम्यान, नाना पटोले यांनी मेरिटवर काँग्रेसला जास्ता मिळायला हव्या होत्या. मात्र, वाटाघाटी करताना घोळ झाला. त्याबाबत राहुल गांधींना सांगण्यात आले. त्यावर त्यांचे समाधान झाले, असे नाना पटोले म्हणाले.