भंडारा: साईबाबा राईस मिलच्या मालकीवरून काका पुतण्यात तुफान हाणामारी झाली असून पुतण्याने काकाला काठी व लोखंडी वस्तूने मारहाण केल्याची घटना घडली शहापूर येथे घडली. विलास श्रीकृष्ण सेलोकर रा. आंबेडकर वॉर्ड शहापूर असे आरोपींचे नाव असून विनोद सुरेश सेलोकर वय ३२ वर्ष रा.आंबेडकर वॉर्ड शहापूर यांचे तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शहापूर येथील साईबाबा राईस मिलचे मालक सुरेश श्रावण सेलोकर व त्याचा पुतण्या विलास श्रीकृष्ण सेलोकर यांच्यात मागील काही महिन्यापासून राईस मिलच्या मालकीवरील हिस्से वाटणीवरून वाद सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले. आरोपी हा फिर्यादीचा चुलत भाऊ आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने साईबाबा राईस मिलचं गेट तोडत असताना फिर्यादीचे वडील सुरेश सेलोकर, वय ७२ वर्ष यांनी रोखले असता आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या हातातील काठीने तक्रार कर्त्याच्या वडीलांचे डाव्या पायावर मारून त्यांना जखमी केले.

हेही वाचा… पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत, शंभर लोकल फेऱ्या रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडिलांना वाचविण्यासाठी आडवे झाले असता मुलालाही आरोपीने मारहाण करून जखमी केले. सुरेश सेलोकर याला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय भंडारा दाखल करण्यात आले असून सदर प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार कडव करीत आहेत.