वर्धा : शाळा विद्यार्थी घडवण्याचे संस्कार केंद्र म्हणून समाजात आदराने या विद्यामंदिरास पाहल्या जात असते. पण याच मंदिरात दारूचे ग्लास, विद्यार्थी निरक्षर, मुख्याध्यापक बेपत्ता तर शिक्षक  सुमार असे चित्र बघायला मिळत असेल तर पालकांनी कुठे जावे, असा प्रश्न पडू शकतो. म्हणून अशा शाळा बंद कां करू नये, अशी नोटीस शिक्षण खात्याने बजावली आहे.

नामवंत यशवंत शिक्षण संस्थेतील शाळात हा प्रकार घडत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा भडंग यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.तो नागपूर शिक्षण उपसंचालक यांना पाठविण्यात आला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी यशवंतच्या केळझर व सेलडोह येथील शाळांना आकस्मिक भेटी दिल्या. तेव्हा शाळेत मुलं बसून मात्र मुख्याध्यापक व शिक्षक बेपत्ता. मुले सांगू लागली की शाळेत बसून काही गावकरी जुगार खेळत असतात.शिक्षक वेळेवर यात नाही.आले तर शिकवीत नाही. मुख्याध्यापक दिसत नसल्याचे विदयार्थ्यांनी सांगितले. तपासणी वेळी दारूचे ग्लास व शिश्या तसेच अन्य कचरा आढळून आला. मुलांचा अभ्यास तपासल्यावर आठवीच्या मुलांना इंग्रजीचा एकही शब्द वाचता आला नाही.

हेही वाचा >>> नागपूर पोलिसांना झाले तरी काय ? चोऱ्या घरफोड्या वाढल्या…

दोन्ही भेटीत मुख्याध्यापक दिसलेच नसल्याचे अहवालत नमुद आहे.

अहवालत असे ताशेरे ओढून या शाळा शिक्षणाच्या कामाच्या नाही, असे स्पष्ट करण्यात आले.  मुख्यध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. पण काहीच फरक पडला नाही. या दोन्ही शाळांची जबाबदारी घेणारे कोणीच नसल्याने या शाळा बंद करण्याची शिफारस केली आहे, असे नागपूर शिक्षण उपसंचालक यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे. या अश्या शिफारशीमुळे वर्धेच्या शिक्षण वर्तुळत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> मॅक्सी कॅबची वाहतूक अधिकृत करण्याचा डाव… एसटी बससह प्रवाशांची सुरक्षा

संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख हे या संदर्भात बोलतांना म्हणाले की शिक्षणाधिकारी यांनी भेट दिल्याचे समजले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचे उत्तर आल्यावर पुढील कारवाई करणार. शाळा व्यवस्थापन समिती वारंवार शाळा तपासणी करीत असते. हा नेमका काय प्रकार घडत आहे याची चौकशी करू. संस्थेचे नाव खराब करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, असे संस्थाध्यक्ष देशमुख यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र हा अत्यंत गंभीर प्रकार घडला असल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा रंगत  आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठित शिक्षण संस्था म्हणून आजवर नवलौकिक राहला आहे.