नागपूर : सामाज माध्यमातून मैत्री करणे आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात होणे आणि आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. अलिकडे एक प्रकरण नागपुरात उघडकीस आले.
मुंबईत एका व्यक्तीने नागपुरात एका महिलेला फेसबूकच्या माध्यमातून मैत्रीच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध जोडले. तसेच तिच्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक केली.
मुंबईतील ४२ वर्षीय पुरुषाने शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका ४७ वर्षीय महिलेला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्याकडून व तिच्या भावाकडून १२ लाख रुपये उकळले. आरोरोपी कल्पेश कक्कड हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
नागपुरातील जरीपटका पोलिसांनी सांगितले की, कक्कड यांनी फेसबुकवर ऑनलाइन संवाद साधून विवाह आणि आर्थिक विकासाचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास संपादन केला. तो नागपुरातील तिच्या घरी जानेवारी २०२४ ला आला. या भेटीदरम्यान झोपण्याची औषध दिली, शारीरिक संबंध निर्माण केले. त्यानंतर त्या महिलेला आणि तिच्या भावाला बनावट शेअर बाजाराच्या गुंतवणुकीसाठी पैसे देण्यास सांगून त्यांना १२ लाख रूपयांनी फसवले शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पैसे मागितले. आणि एक रुपयाही परत केला नाही. जेव्हा त्या महिलेने त्याविषयी विचारणा केली. तेव्हा आरोपीने धमक्या दिल्या, त्याने तिचे खाजगी छायाचित्र व्हाटरल करण्याची धमकी दिली.
पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर बुधवार आरोपीवला पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपीला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीत समार आले आहे की, आरोपी इतर शहरांमध्ये देखील महिलांची फसवणूक आणि शोषण करीत होत होते. पुणे पोलिसांनी नागपूर आणि हैदराबादच्या घटनांसाठी दोन शून्य एफआर पूर्वी नोंदवलेल्या आहेत.
पुण्यात अद्याप कोणतीही अधिकृतपणे तक्रार दाखल केलेली नाही, परंतु सुत्राच्या म्हणण्यानुसार आर्थिक फसवणुकीच्या चौकशीत पुण्यातील हॉटेल नोंदणी आहे. आरोपीने एका अन्य महिलेसोबत संशयास्पद परिस्थितीत हॉटेलमध्ये वास्तव्य केले होता. पोलिसांच्या विश्वसनीय सुत्रानुसार आरोपीने नागपूर शहरांतून संगणकाच्या माध्यमातून फसणूक चालवली आहे. अशा प्रकारची तपास सुरू आहे. त्याच्या प्रवासाच्या नोंदी, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल डेटा ट्रेल्समध्ये पोलीस शोध घेत आहेत जेणेकरून अधिक पीडितांचा शोध घेता येईल. आरोपींनी ज्या महिलांची फसणूक केली. त्या महिलांनी महिलांनी पुढे येऊन चौकशीमध्ये मदत करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.