गोंदिया: जिल्हा परिषदेत शार्टसर्किटने आग लागल्याची घटना आज बुधवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. गोंदिया जिल्हा परिषदेत नेहमीच शार्ट सर्किटने आग लागल्याचे बघावयास मिळते. या पूर्वी पण अशी घटना घडलेली असून सुद्धा याची स्थायी व्यवस्था का केली जात नाही ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आज बुधवारी लागलेल्या आगीमुळे कुठलेही नुकसान झाले नाही मात्र संपूर्ण जिल्हा परिषदेत काळोख पसरला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दरवर्षी येथे आग लागण्याच्या घटना येथे घडतात.

आज बुधवारी येथील संपूर्ण जिल्हा परिषदेला विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य प्रवाहात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामुळे काही काळ पुरती त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची अक्षरश: तारांबळ उडाली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्यामुळे ती विझवायची कशी हा प्रश्न होताच. लगेच इलेक्ट्रिशियनला भ्रमणध्वनी करून पाचारण करण्यात आले. त्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी या आगीवर वाळू टाकून ती आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.पण ते सुद्धा अपुरे पडले. अखेर काही वेळातच इलेक्ट्रिशियन ने येऊन ती आग विझवण्यासाठी इतर उपस्थिता सह प्रयत्न केल्याने ती आग आटोक्यात आली. मात्र या नंतर संपूर्ण जिल्हा परिषदेत काळोख पसरला होता. इलेक्ट्रिशियन ने तात्पुरती व्यवस्था करून सध्या विद्युत पुरवठा सुरू केलेला आहे. पण आज संपूर्ण जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा करणारी स्विच बंद केले असल्यामुळे ती दुरुस्त झाल्याशिवाय बोअरवेल सुरू होणार नसल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चे सचिव सुभाष खत्री यांनी दिली.

हेही वाचा >>>समृद्धी महामार्गावर खासगी बसची टँकरला धडक; १२ प्रवासी जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

” जिल्हा परिषदेत मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या प्रवाहाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती मला माझ्या कर्मचाऱ्यांनी दिली. मी सध्या बाहेर आहे .पण या नेहमी उन्हाळ्याच्या दिवसात लागणाऱ्या आगीची स्थायी व्यवस्था या पुढे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली.