लोकसत्ता टीम

नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षात तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर महापालिका हद्दीतील आहेत, हे विशेष.

Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ मध्ये डेंग्यूचे ५ हजार ५२७ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ५५२ रुग्णांना डेंग्यू असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. तर २०२३ मध्ये येथे २३ हजार ७४४ संशयित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी तब्बल २ हजार ३६५ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये डेंग्यूग्रस्तांची संख्या चारपट वाढली. त्यापैकी सर्वाधिक ८६५ रुग्ण हे नागपूर महापालिका हद्दीत आढळले. तर नागपूर ग्रामीणमध्येही ४३९ रुग्णांची नोंद झाली, हे विशेष.

आणखी वाचा-जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये म्हणून दिलेले आश्वासन ही सरकारची चुकीची खेळी, ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया

डेंग्यूची स्थिती

जिल्हा/ शहर२०२२ २०२३
भंडारा ०१९०२९
गोंदिया१७५ २०८
चंद्रपूर १०० ३८०
गडचिरोली ०७७२३३
नागपूर (श.)११८ ८६५
नागपूर (ग्रा.)०४० ४३९
वर्धा ०२३२११
एकूण ५५२ २,३६५