सिरोंचा-हैद्राबाद तथा सिरोंचा-जगदलपूर या तेलंगणा व छत्तीसगड राज्य महामार्गासह १७ मार्ग पुरामुळे बंद आहेत. वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, पर्लकोटा, गोदावरी या नदीचे पाणी दुथडी भरून वाहत असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे १७ मार्ग बंद आहेत.

बंद मार्गांमध्ये आलापल्ली ताडगांव भामरागड (पर्लकोटा नदी, गुंडेनुर नाला, कुमरगुडा नाला, हेमलकसा नाला, कुडखेडी नाला, ताडगाव नाला, पेरमिली नाला), चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट रस्ता (पोहार नदी पोटेगांव जवळ), सिरोंचा कालेश्वरम वारंगल हैद्राबाद रस्ता (गोदावरी नदीवरील मोठा पूल) , अहेरी बेजुरपल्ली परसेवाडा लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाला ), गडचिरोली आरमोरी (पाल नदी गोगांवजवळ), निझमाबाद सिरोंचा जगदलपूर रस्ता (सोमनपल्ली नाला), गडचिरोली चामोर्शी (शिवनी नाला), आलापल्ली आष्टी गोंडपिपरी रस्ता (वैनगंगा नदी), कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी, मोहझरी लोकल नाला), अहेरी मोयाबीनपेठा वटरा रस्ता (वटरा नाला),भेंडाळा गणपूर बोरी अनखोडा रस्ता (हळदीमाला नाला, अनखोडा नाला ), वडसा कोकडी पिंपळ गाव अरतोंडी आंधळी रस्ता (आंधळी जवळ नाला ), मौसीखांब वडधा वैरागड शंकरपूर चोप कोरेगांव ते जिल्हा सिमेपर्यंतचा रस्ता (स्थानिक नाला), आष्टी आलापल्ली रस्ता (दिना नदी), अहेरी गडअहेरी देवलमारी रस्ता (गडअहेरी नाला), खरपूंडी दिभना बोधली रस्ता (लोकल नाला), चामोर्शी शंकरपूर हेटी मार्कंडा देव फराडा मोहोली रामाळा घारगाव दोडकुली हरणघाट (लोकल नाला) या मार्गाचा समावेश आहे.

वर्धा : पूरतडाख्यामुळे शेकडो गावे संकटात; उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या विशेष पाहणी दौऱ्यावर येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती असून शेकडो गावे संकटाच्या सावटात आहे. १०० टक्के भरलेल्या दहा मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या ७५ दारांतून तसेच २० छोट्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या १२ ऑगस्टला वर्धा तालुक्याच्या विशेष पाहणीसाठी येणार आहेत.