बुलढाणा: स्वस्तात सोने मिळवण्याचा मोह अनेकांना नडतो. नागपूर येथील एका इसमाला असाच एक वाईट अनुभव आला. बुलढाणा जिल्ह्यातील आरोपींनी त्याला तब्बल नऊ लाख रुपयांनी गंडविले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा : नियतीचा न्याय! ‘त्या’ बलात्काऱ्याला न्यायालयातून शिक्षा मिळण्यापूर्वीच…

अशाच काही मंडळींनी नागपूर येथील आदित्य मेश्राम यांना सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून खामगाव येथे बोलावले. आदित्य खामगावात पोहोचले. तालुक्यातील शिर्ला नेमाने गावाजवळ त्यांच्या जवळून ९ लाख घेऊन आरोपी फरार झाले. हे वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.