नागपूर : रेल्वे रुळांवर प्राणी किंवा इतर कोणीही येऊ नये, गाड्यांना वेगाने धावता यावे म्हणून मध्य रेल्वे विभाग रुळाशेजारी सुमारे १,१४१ कोटी रुपये खर्चून १२०० किलोमीटर लांब संरक्षक भिंत उभारणार आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधात वाढ करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागपूर ते इटारसी, नागपूर ते सेवाग्राम, सेवाग्राम ते बल्लारपूर तसेच नागपूर ते राजनांदगाव दरम्यान नवीन रेल्वेमार्गाचे तिहेरी, चौपदरीकरण सुरू आहे. शिवाय वंदे भारत आणि इतर ‘सेमी हायस्पीड’ गाड्या सुरू करण्यावर रेल्वेचा भर आहे.

रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी लोकवस्त्या आहेत. तसेच काही भागात प्राण्याचा वावर असतो. रेल्वे रुळांपासून मानव आणि प्राणी दूर राहावे. तसेच रुळांना कुणी नुकसान पोहचवू नये, यासाठी ही भिंत उभारण्यात येत आहे. यामुळे रेल्वे रुळ अधिक सुरक्षित होतील आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढेल. तसेच रेल्वेगाड्यांना विलंब होण्याचे प्रमाण कमी होईल. रुळांशेजारी संरक्षक भिंत उभारल्याने वन्य प्राण्यांचे अपघातही कमी होतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. रुळांवर आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहेत. संरक्षक भिंतीमुळे ते देखील टाळता येईल, असा सुरक्षा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : जातीआधारित आरक्षणाबाबत ‘व्हॉट्सॲप’वर चर्चा गुन्हा? उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय…

इटारसी ते आमला दरम्यानच्या २२ किलोमीटरच्या पट्ट्यात संरक्षक भिंती उभारण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली. सेवाग्राम ते नरखेड दरम्यान ३० कोटी रुपये खर्चाचा ३८ किलोमीटरचा मार्गही पूर्ण झाला आहे. काळा पत्थर-पोळा पत्थर-मगदोह (नागपूर-भोपाळ विभाग) दरम्यानची संरक्षक भिंतही पूर्ण झाली आहे. काही विभागांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही भागात काम पूर्ण होत आहे, असे मित्तल म्हणाले.

Story img Loader