नागपूर : नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून नागपूर ते मुंबई आणि पुणे, सोलापूर ते नागपूर मार्गावर विशेष गाड्या विशेष शुल्कावर चालवण्यात येत आहेत. नागपूर-मुंबई एलटीटी विशेष गाडी नागपूर येथून २४ ऑक्टोबर (मंगळवार) रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण येथे थांबेल.

नागपूर-पुणे विशेष गाडी नागपूर येथून २४ ऑक्टोबरला (मंगळवार) रोजी नागपूरहून रात्री ११ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड येथे थांबेल.

हेही वाचा : गूढ मृत्यूसत्राचा अखेर उलगडा, अन्नपाण्यातून विष देत पाच जणांची हत्या; सून, मामीचे दुष्कृत्य

नागपूर-मुंबई एलटीटी विशेष गाडी नागपूर येथून २५ ऑक्टोबरला (बुधवार) रोजी नागपूरहून दुपारी ३ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण येथे थांबेल.

हेही वाचा : “संघाचा पाया त्यागावर उभा कारण…”; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विधान, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर – नागपूर सुपरफास्ट स्पेशल सोलापूर येथून २४ ऑक्टोबरला (मंगळवार) रोजी रात्री ८.२० वाजता सोलापूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.५ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबेल.