नागपूर : प्रतापनगरमधील गणेश कॉलनी, शांती निकेतन कॉलनीच्या मैदानावर दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो. या मैदानावर सध्या जलकुंभाचे काम सुरू आहे. तेथे टँकर, ट्रक येत असल्याने मैदान खराब झाले आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षण क्रांती मोर्चा: बुलढाण्यात येणाऱ्या मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त
हेही वाचा – ‘बीआरएस’ही मैदानात! मराठा आरक्षणावर सुचविला ‘हा’ तोडगा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गणेशोत्सव तोंडावर असताना मैदानात गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी जागाच शिल्लक नाही. महापालिकेने या मैदानाचे सपाटीकरण करून द्यावे, अन्यथा जलकुंभाचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या भागातील रहिवाशांनी जलकुंभाकरिता जागा दिली, पण त्याच वस्तींना पाणी मिळणार नाही. त्यामुळे जलकुंभाचा काय फायदा, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.