नागपूर : चोरी करण्यासाठी घरात शिरून कपाटातील महिलांच्या अंतरवस्रांशी खेळणाऱ्या, महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. या युवकाची दहशत परसली होती. अनेक महिलांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते.घटनेच्या दिवशी तो एका घरात चोरी करण्यासाठी शिरला. झोपेत असलेल्या एका ६० वर्षीय महिलेशी चाळे करून पळून गेला होता. पोलिसांनी युवकाला अटक केली. संतोषकुमार दास (२८) रा. बिहार असे त्यांचे नाव आहे.

आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असून कामाच्या शोधात नागपुरात आला. तो एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करतो. त्याला महिलांना स्पर्श करण्याची तसेच त्यांच्या कपडे चाकूने फाडण्याची विकृती आहे. त्याच्या विरूध्द अनेक तक्रारी आहेत. वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या ६० वर्षीय महिला झोपेत असताना त्याने दाराची कडी तोडून घरात घुसला.

हेही वाचा…घरी सोडून देण्याच्या बहाण्याने महिलेचे सर्वस्व लुटले, काय घडले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपाटात महिलांचे कपडे शोधले आणि चाकूने फाडत बसला. महिलेला स्पर्श केला. त्याच्या हातून काहीतरी पडल्याने आवाज झाला. त्या आवाजाने महिलेला जाग आली. तिने आरडा ओरड केली, त्यामुळे आरोपी पळून गेला. वाडी पोलीस शनिवारी रात्री गस्तीवर असताना एका संशयित युवकाला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता पहाटेच्या सुमारास घरात शिरल्याची त्याने कबुली दिली. पीडित महिला तसेच वस्तीतील इतर महिलांनीसुध्दा आरोपीची ओळख पटविली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.