नागपूर: ‘युवा ग्रॅज्युएट फोरम’च्या पुढाकारातून व संविधान फाऊंडेशन, सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून संविधान दिनाच्या निमित्ताने रविवारी सकाळी ७ वाजता अण्णाभाऊ साठे चौक (दीक्षाभूमी) ते संविधान चौक ‘वाॅक फाॅर संविधान’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. या वाॅकथाॅनमध्ये शासकीय- निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्था, संघटना, महिला, युवा यांनी संविधानाच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी संविधान दिन चिराऊ होवो अशा घोषणाही दिल्या होत्या.

हेही वाचा : शाळेत शिक्षकाचा, तर ग्रामसभेत एकाचा दारु पिऊन धिंगाणा; गावकऱ्यांनी चोपले

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अण्णाभाऊ साठे चौकात हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. त्यानंतर हजारो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले. संविधान चौकात या रॅलीचा समारोप सोहळा झाला. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आयोजकांच्यावतीने संविधान फाऊंडेशनचे प्रमुख निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. तसेच अतुलकुमार खोब्रागडे व डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी ‘वाॅक फाॅर संविधान’ रॅलीचे नियोजन केले.

Story img Loader