नागपूर : लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर रकसोल एक्सप्रेस ने आज सकाळी चार वाहताच्या सुमारास एका गर्भवती सांबराला जोरदार धडक दिली. या धडकेत तिचा व तिच्या पोटात पुर्णवाढ झालेल्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की सांबराचे पोट फाटले गेले आणि पिल्लू रेल्वे रुळाच्या बाजूला पडले. त्या पिल्लाच्या कोवळ्या पायाचे खूर देखील गुलाबीसर होते.

रेल्वेने दिलेली धडक एवढी जोरदार होती की, सांबराच्या पोटाचा कटलेला भाग पिल्लापासून जवळपास १०० मीटर दूर फेकल्या गेला. तर सांबराचे मागील पाय सुमारे ५० मीटर दूर फेकल्या गेले. सांबराच्या पोटाचा भाग पूर्णपणे रेल्वे अपघातात अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत रुळावर पडलेला होता. बल्लारशाह-गोंदिया रेल्वे जंगलातून जाते आणि सर्वात जास्त अपघात हे लोहारा ते मूल दरम्यान होतात. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी ह्या रेल्वे रुळावरून जाणाऱ्या प्रत्येक प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवून असते व रेल्वे अपघातात मृत वन्यप्राण्यांचे शास्त्रीय पद्धतीने नोंदी करते. हा रेल्वे रूळ वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरलेला आहे. म्हणून त्यात पुन्हा दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडून गेलेला आहे.

एकाच रेल्वे रुळावरून असंख्य वन्यजीवांना अपघातात आपले जीव गमवावे लागले आहेत, तर दुसरी लाईन झाल्यावर वन्यजीवांना रेल्वे रूळ ओलांडणे अशक्यच होईल. अशावेळी वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग कसा सुरक्षित राहील, असा प्रश्न हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने उपस्थित केला आहे. यावर शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना न करता अशास्त्रीय पद्धतीने कुंपण तयार करण्यात आलेले आहे. पाच फुटांवरून सांबर, हरीण, वाघ, बिबट हे सहज उडी मारून जाऊ शकतात. अशावेळी अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आलेल्या या तुटपुंज्या उपाययोजना काय कामाच्या, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उपाय योजना कराव्या, अशी मागणी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने वनविभाग व रेल्वे प्रशासनाला केलेली आहे. मात्र, अजूनतरी या दोन्ही खात्याला जाग आलेली नाही. या मार्गावर आधीच वाघ, बिबट यांचेही मृत्यू झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जुनोना श्री, मेश्राम , वनपाल डी. जी कांबळे, वनरक्षक आर. पायपरे तसेच घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, किरण बावस्कर, नाजिश अली उपस्थित होते.