नागपूर : झेंडा चौकातील एका ब्युटी पार्लर-स्पाच्या नावावर सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या छाप्यात दोन विद्यार्थिनींसह चौघींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. ‘सेक्स रॅकेट’ची संचालिका शिला कैलास भोवते (३५, चामटचक्की चौक, आदर्शनगर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

गुन्हे शाखेचे अधिकारी अयुब संदे यांना माहिती मिळाली की, आशा भोवते ही गेल्या अनेक दिवसांपासून तरुणींकडून देहव्यापार करवून घेत होती. तिने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झेंडा चौकात आनंदनगर, संगम टॉकीज रोडजवळ केसी फॅमिली सलून नावाने ब्युटी पार्लर-स्पा सुरु केले. यामध्ये आंबटशौकींना ग्राहकांना तरुणींना पुरविण्यात येत होते. त्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये तिने देहव्यापारासाठी विशेष व्यवस्था केली होती. तिने पारडी आणि कामठीतील दोन विद्यार्थिनींना मसाजच्या नावावर देहव्यापार करण्यास भाग पाडले. तर दोन विवाहित तरुणींनाही आंबटशौकींना ग्राहकांसोबत देहव्यापार करण्यास भाग पाडले.

हेही वाचा…राज्यातील वीज पुरवठा धोक्यात! कंत्राटी वीज कर्मचारी संपावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून केसी सलूनमध्ये वेगवेगळ्या तरुणी यायला लागल्या. तसेच महिलांच्या ब्युटीपार्लरमध्ये पुरुषांची गर्दी होत असल्यामुळे अनेकांना संशय आला. सहायक पोलीस निरीक्षक अयुब संदे, अविनाश जायभाये, सुनील ठवकर यांनी सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून तरूणींना उपलब्ध करण्यास सांगितले. आशाने लगेच चारही तरुणींना समोर केले आणि ग्राहक समजून सौदा केला. बनावट ग्राहकांनी पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी छापा घालून चारही तरुणींना ताब्यात घेतले तर आशा भोवतेला अटक केली.